Tarun Bharat

कोल्हापूर : कोगेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी/कसबा बीड

करवीर तालुक्यातील कोगे गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे गावकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

कोगे गावातील रुग्ण शिरोली एमआयडीसी येथे हे सुपरवायझर या पदावर काम करीत होते. तेथील 20 जणांचे स्वॅब घेतले होते. त्यामध्ये सदर रुग्णाचा प्रथम दर्शनी रिपोर्ट मिळाला नाही. 22 जुलैला दुसरा स्वॅब दिल्यानंतर पॉझिटिव्ह आला. सदर रुग्णास सीपीआर येथे कोव्हिड सेंटरला नेण्यात आले. तिथे नेल्यानंतर कोरोना संसर्गजन्य रोगाची असणारी लक्षणे यापैकी कोणतेही लक्षण दिसून आले नाही. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे व कुटुंबीयांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

प्रथम अहवाल मिळत नाही? नंतर पॉझिटिव्ह येतो ? त्याची लक्षणे दिसत नाहीत? कोरोनाव्हायरस होणारी चाचणी खरोखरच योग्य आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे काही मिळत नाहीत अशी गावात कुजबुज होत आहे. रात्र थोडी..सोंगे फार.. अशा पद्धतीचे अनुभव कोरोना संसर्गजन्य रोगाच्या काळामध्ये पहावयास मिळत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

Related Stories

शेतकरी सन्मान दिवस साजरा

Archana Banage

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्विकारला आपला पदभार

Abhijeet Khandekar

सीमाप्रश्नी भाजपचे धोरण दुटप्पी : खा. विनायक राऊत

Archana Banage

साताऱयात होणार प्रथम दर्जाचे ट्रामा केअर युनिट

Patil_p

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचीच बाजी; आपल्या जिल्ह्याचा निकाल पहा एका क्लिकवर

Archana Banage

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी

Archana Banage