Tarun Bharat

कोल्हापूर : कोडोलीत लोकमान्यच्या रांगोळी स्पर्धात तनूजा महाडिक प्रथम


वारणानगर / प्रतिनिधी


बेळगांव येथील लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑप सोसायटीच्या कोडोली ता. पन्हाळा येथील शाखेच्या वतीने दिपावली निमीत्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धात तनूजा महाडिक हिने प्रथम क्रमांक पटकावला.


तरुण भारतचे समूह सल्लागार संपादक संस्थापक असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑप सोसायटीने रौप्य महोत्सव पार करून पाच हजार कोटी रू. ठेवीचा टप्पा २१७ शाखेच्या माध्यमातून गाठत आणला असून कोडोली शाखेने नऊ कोटी रू. च्या उद्दीष्टाकडे वाटचाल केली आहे.


लोकमान्यचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली शाखेच्या वतीने दिपावली निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजीत केली होती यामध्ये सुमारे १५० हून अधिक स्पर्धकानी सहभाग घेतला होता लोकमान्यचे .कोडोली शाखेचे व्यवस्थापक मारूती पाटील, उपशाखा व्यवस्थापक रविराज खेरुगडे,सत्यम कदम,यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.


रांगोळी स्पर्धात प्रिती कांबळे यानी द्वितीय, प्रिया सोनार यानी तृतीय क्रमांक पटकावला अमृता प्रितमकुमार कांबळे, दिशा पाटील, अनिता पाटील, मनिषा पाटील, वंदना शिंदे, वैशाली जाधव, जयश्री कापरे यांना उत्तजनार्थ बक्षिस आविनाश मोरे, संदीप साबळे यांच्या हस्ते देण्यात आले.

Related Stories

कोल्हापुरातील खंडोबा तालीमच्या अध्यक्षपदी सुरेश पोवार

Archana Banage

कोल्हापूर : शिरोळमधील शतायु हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा तयार

Archana Banage

कोल्हापूर मनपा मतदार यादी हरकतीसाठी मुदतवाढ द्या

Archana Banage

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलीसांना दिसली नाही का? : इंगवले

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डीकेटीईमध्ये नॅनो फिनीशचे संशोधन

Archana Banage

मंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱयावर शहर शिवसेनेला बळ

Archana Banage