Tarun Bharat

कोल्हापूर : कोथळीतील वीरजवान सतीश वायदंडे अनंतात विलीन

प्रतिनिधी /जयसिंगपूर

कोथळी ता.शिरोळ येथील वीर जवान सतीश सोनाप्पा वायदंडे (वय-36 वर्षे) यांची आसाम(सिक्कीम) येथे सेवा बजावत असताना अपघात होऊन गुरुवार दुपारी निधन झाले. आज सोमवार सकाळी त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रथम शहिद जवान सतीश यांच्या घरात मध्ये प्राथिँव नेण्यात आले. याठिकाणी खिश्चन धर्मानुसार रेव्ह.शमुवेळ तिवडे व पास्टर. आदाम तिवडे यांच्या वतीने श्रद्धांजली प्रार्थना करण्यात आले. बस स्टँड परिसरात प्राथिँव कुटुंबियांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी वायदंडे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान बस स्टँड परिसरात सजवलेल्या वाहनातून गावात आणण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही तर्फा फुलांनी सजावट केली होती. वीर जवान अमर रहे…अमर रहे, भारत माता की जय, व्यर्थ ना हो बलिदान अशा घोषणा देण्यात आले. त्याच्यावर ख्रिस्ती पध्दतीने दफन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच तहसीलदार अर्पणा धुमाळ-मोरे व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, शिरोळ तालुका काॅग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राम शिंदे, पं.स.सदस्य कांबळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, ग्रामविकास अधिकारी सी एम केबळे, पोलिस पाटील किरण खडागळे, तलाठी शैलश कोईगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

जवान सतीश वायदंडे हे 2009 साली इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर या शिक्षणावर सैन्यातील खात्यामध्ये निवड झाली होती. पुणे, काश्मीर, आसाम येथे त्यांनी देशसेवा बजावली आहे. सतिश हे आपल्या कोथळी या मुळ गावी 25 डिसेंबर 2019 खिस्म्रस या सणासाठी आले होते. यानंतर त्यांनी 2 जानेवारी 2020 ला आपल्या पत्नी सोबत आसाम येथे नोकरीवर रुजु झाले. सतिश वायदंडे यांचे गेल्या 3 वर्षापूर्वी लग्न झाले. त्यांच्या पाश्चात्य वडील, आई, पत्नी, भाऊ, भावजय, असा परिवार आहे.

नामदार यड्रावकर यांचे विशेष प्रयत्न

नामदार यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहिद सतीश यांच्या कुटुंबियांना पार्थिव मिळाले. नाम.यड्रावकर यांनी गेल्या चार दिवसापासून शहिद सतीश यांचे पार्थिव आसाम मधुन आणण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल, खा.शरद पवार, साताराचे खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी व कुटुंबांशी वेळोवेळी चर्चा करीत होते.


शहिद जवान सतीश यांचा पार्थिव व प्रवास

गुरुवार झालेल्या अपघातात शहिद सतीश वायदंडे याचे प्राथिव कोथळीला आणण्यात अनेक अडचणी आल्या तब्बल चार दिवस कुटुंबयाना व गावातील नागरिक ओढ लागुन राहिली होती. अखेर सोमवारी सकाळी कोथळीत शहिद सतीश यांचे प्राथिव आणण्यात आले. सिलीगुड्डी ते पुणे विमान प्रवास व पुणे ते कोथळी आर्मी वाहनातून प्राथिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Stories

कोल्हापूर : विवाहितेच्या छळाबद्दल पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

कोरे गुरुजींचे बलिदान व्यर्थ जाणार ?

Archana Banage

नवनीत राणांच्या MRI चं सेनेकडून ‘ऑपरेशन’, ‘लीलावती’ला धरलं धारेवर

datta jadhav

कोल्हापूर : एक हजार`रेमडेसिवीर’ची खरेदी करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

कोल्हापुरात १० कार फोडल्या, राजवाडा पोलिसांनी स्वप्नील तावडे या युवकाला घेले ताब्यात

Abhijeet Khandekar