Tarun Bharat

कोल्हापूर : कोरे अभियांत्रिकीचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार

सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेशन कोर्सेस व नोकरीच्या संधी

प्रतिनिधी / वारणानगर

आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट कोर्सेस व रोजगाराच्या संधी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने या वर्षी सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच कंपन्यांशी सामंजस्य करार केलेला आहे. यामध्ये सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेटवर्किंग, अमेझॉन वेब सर्विसेस सेंटर ऑफ एक्सैलेन्स फोर क्लाउड कंपुटींग, ब्ल्यू प्रिजम युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मायक्रोचीप सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट आणि ऐजूस्किल फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेटवर्किंग ही कंपनी आयओटी फंडामेंटल कोर्सेस, फंडामेंटल सायबर सेक्युरिटी कोर्सेस, सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएट, सिस्को सर्टिफाइड डेवनेट असोसिएट, सिस्को सर्टिफाइड सायबर ओपस असोसिएट आणि नेटवर्किंग हे कोर्सेस महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देणार आहेत. तर अॅमझोन वेब सर्विसेस सर्टिफाइड क्लाऊड फाउंडेशन सर्टिफाइड सोल्युशन्स, आर्किटेक असोसिएट असोसिएट अकॅडमी, मशीन लर्निंग फाउंडेशन हे कोर्स महाविद्यालयात उपलब्ध करून देणार आहेत मायक्रोचीप सेंटर पीसीबी डिझाईनिंग प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग आणि इतर कोर्सेस उपलब्ध करून देणार आहेत ब्ल्यू प्रिझम युनिव्हर्सिटी सिंगापूर फाउंडेशन कोर्स आणि सर्टिफाइड डेव्हलपमेंट कोर्स महाविद्यालयात उपलब्ध करून देणार आहेत.

वरील नमूद केलेल्या सर्व कोर्सेसची फी बाजारात तीस हजाराहून अधिक आहे परंतु महाविद्यालयात हे कोर्सेस संबंधित कंपनीच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देणार आहेत. वरील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देण्यासाठी महाविद्यालयातील नऊ मास्टर ट्रेनर तयार केलेले आहेत. या कोर्सेससाठी बाहेरील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या कौशल्य विकासामध्ये वाढ होण्यास मदत होईल.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सेंटर ऑफ एक्सैलेन्स साठी सर्वांचे अभिनंदन केले. सामंजस्य करार होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख सी. पी. शिंदे आणि एन बी जाधव यांचे सहकार्य लाभले. या सेंटर ऑफ एक्सलन्स कोर्सचे प्रमुख समन्वयक म्हणून डॉ. संतोष भोपळे हे काम पाहत आहेत.

Related Stories

वळीवडे येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याने तरुणावर गुन्हा दाखल

Archana Banage

आणखी तीन बळी, ५१ पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत संशयास्पद वीस लाखाची रक्कम जप्त

Archana Banage

आरक्षणाच्या मोर्चासाठी राज्यातून मराठा समाज येणार

Archana Banage

शिये पाच दिवस लाॅकडाऊन : संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

Archana Banage

कबनूर येथे नवविवाहितेने राहत्या घरी केली आत्महत्या

Archana Banage