Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोनाचा आणखी एक बळी,पाच वाजेपर्यंत 138 पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात कोरोनाबळीच्या संख्येत वाढ होत आहे. आज हातकणंगले येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 55 झाली आहे. तर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आणखी 24 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यानंतर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह संख्या 2343 पोहचली आहे. यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

आज बारा पर्यंत आलेल्या अहवालात महापालिका हद्दीतील 9, राधानगरीतील सात, शिरोळ तालुक्यातील चार, हातकणंगले तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. काल रविवारी जिल्ह्यात कोरोनाने 8 बळी घेतले होते. तर 176 रुग्णांची भर पडली होती.

दुपार पर्यंत 66 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण 66 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले.
यामध्ये महापालिका क्षेत्रात 14, पन्हाळा तालुक्यातील नऊ, कागल तालुक्यातील 8, हातकणंगले तालुक्यातील सात आणि गडहिंग्लज तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली, कागल मधील गैबी चौक, गोरंबे, मांगुर आणि मौजे सांगाव, हातकणंगले तालुक्यातील इचरकरंजी, हुपरी कबनूर, नागाव, करवीर तालुक्यातील गांधीनगर, उचगाव गडहिग्लज तालुक्यातील महागाव, हिरलगेचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले आहेत. त्यामध्ये चंदगड येथील 41 इचरकंजी येथील 27 हातकणंगले तालुक्यातील चार यांचा समावेश आहे.

गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या गतीने वाढू लागल्यामुळे आज पासून सात दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरात आज सर्वत्र शांतता पाहयला मिळाली. अत्यावश्यक सेवा वगळता रस्तावर कोणतीही वाहने पाहयला मिळाली नाहीत. तर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

एसटी कर्मचाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात

Abhijeet Shinde

राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण-पालकमंत्री विखे-पाटील

Abhijeet Khandekar

कबनूरमध्ये कोरोनाने एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

राधानगरीचा ४ था दरवाजा बंद, अजूनही दोन दरवाजे उघडे

Abhijeet Khandekar

न्यू करंजे येथे बिबट्याचा वासरावर हल्ला

Sumit Tambekar

“माझ्या पराभवासाठी दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!