Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोनाचे 24 बळी, 603 पॉझिटिव्ह

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16 हजारांवर,

दिवसभरात कोरोनाने शहरात 10 जणांचा मृत्यू

आजचे कोरोना मृत्यू 24

                  आजचे कोरोनामुक्त ः 499

                  आजचे पॉझिटिव्ह  ः 603

               एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ः 16282

               आजपर्यतचे कोरोना मुक्त रुग्ण ः 8576

               सध्या उपचार घेणारे सक्रीय रुग्ण  ः 7240

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 24 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोना बळींची संख्या 463 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 603 नवे रुग्ण दिसून आले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आजपर्यतची संख्या 16 हजारांवर पोहोचली आहे. सायंकाळपर्यत 499 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोल्हापूर शहरात 24 तासांत कोरोनाने 10 जणांचा मृत्यू झाला.

बुधवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील पुरुष, करवीर तालुक्यातील कांडगाव येथील वृद्धा, मंगळवार पेठेतील वृद्ध, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील महिला, येथील शनिवार पेठेतील वृद्ध, कनाननगर येथील वृद्ध, लाईन बाजार येथील वृद्धाचा मृत्यू झाला.

कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील वृद्ध, शहरातील बिंदू चौकातील वृद्धाचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये प्रतिभानगर येथील वृद्धेचा मृत्यू झाला. कागल येथील पुरुषाचा कोल्हापुरात मृत्यू झाला. नागाळा पार्क येथील हॉस्पिटलमध्ये मंगळवार पेठेतील महिला, महाराणा प्रताप चौकातील हॉस्पिटलमध्ये कणेरीवाडी येथील पुरुष, साकोली कॉर्नर येथील वृद्धाचा मृत्यू झाला. भोसलेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये राजारामपुरी 10  व्या गल्लीतील पुरुष, इचलकरंजी राजेश्वरीनगर येथील वृद्ध, शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील पुरुषाचा मृत्यू झाला. कसबा बावडा येथील पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला.

शिरोळ येथील केअर सेंटरमध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील वृद्धाचा मृत्यू झाला. आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील मयूर हॉटेल परिसरातील वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील आळते येथील वृद्ध, तळसंदे येथील वृद्ध, हुपरी येथील वृद्ध आणि शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्हय़ातील कोरोना मृत्य़ूंची संख्या 463 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 165, नगर पालिका क्षेत्रातील 168, कोल्हापूर शहरातील 114 आणि अन्य 16 कोरोना बळींचा समावेश आहे.

आजअखेर 8 हजार 579 जणांना डिस्चार्ज

बुधवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीनॅट चाचणीचे 1 हजार 70 अहवाल आले. त्यापैकी 842 निगेटिव्ह तर 217 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 1 हजार 22 अहवाल आले. त्यापैकी 864 निगेटिव्ह तर 158 पॉझिटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील 228 पॉझिटिव्ह असे 603 नवे रुग्ण 24 तासांत मिळून आले आहेत.

जिह्यात आजअखेर 16 हजार 282 पॉझिटिव्हपैकी 8 हजार 579 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 7 हजार 240 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.

सायंकाळपर्यंत 603 पॉझिटिव्ह रुग्णांत आजरा 8, भुदरगड 14, चंदगड 3, गडहिंग्लज 8, हातकणंगले 66, कागल 24, करवीर 63, पन्हाळा 10, राधानगरी 7, शाहूवाडी 16, शिरोळ 46, नगर पालिका क्षेत्र 151, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 181 व इतर 6 आहेत. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 272, भुदरगड 349, चंदगड 467, गडहिंग्लज 414, गगनबावडा 38, हातकणंगले 1753, कागल 304, करवीर 1760, पन्हाळा 503, राधानगरी 406, शाहूवाडी 419, शिरोळ 806, नगर पालिका क्षेत्र 3357, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 5034 असे 15 हजार 882 आणि इतर 400 अशी 16 हजार 282 रुग्णसंख्या आहे. तसेच 16 हजार 282 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 8 हजार 579 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 463 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रुग्णसंख्या 7 हजार 240 इतकी असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.

Related Stories

Kolhapur; 13 जुलैला दसरा चौकात या…अन्यथा तुमचा कार्यक्रम ओके होईल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : निळे येथील विवाहितेचा मृतदेह नदी पात्रात आढळला

Archana Banage

सहजयोग ध्यानाचे रविवारी सलग बारा तास प्रशिक्षण

Archana Banage

कोल्हापूर : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तीनशे केंद्रावर

Archana Banage

पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांची नावे जाहीर

Archana Banage