Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती दान करुन सहकार्य करा

Advertisements

कागल पालिका प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी / कागल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून कुणीही श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन दूधगंगा नदी, पाझर तलाव, जयसिंगराव तलाव या ठिकाणी करू नये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावरोखण्यासाठी श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन न करता गणेशमुर्ती नगरपालिकेस दान करावयाची आहे. नगरपालिका प्रशासन योग्य ती काळजी घेऊन विधीवत श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन करेल, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

याठिकाणी गर्दी न करता नगरपालिका प्रशासनाकडे आपली मुर्ती दान करता येणार
हिंदुराव घाटगे हायस्कूल पटांगण, खर्डेकर चौक, श्री. यशवंतराव घाटगे हायस्कूल पटांगण, नामदार हसनसो, मुश्रीफ सांस्कृतिक हॉल, श्रमिक वसाहत शेजारील खुली जागा काळम्मावाडी वसाहत (पटांगण), गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, जयसिंगराव पार्क, यशवंत किल्ला पटांगण, गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल, अनंत रोटो, तु.बा.नाईक विद्या मंदिर, कागल कोर्टासमोर, गहिनीनाथ नगर कमानी शेजारील खुली जागा, शाहू हॉल, गैबी चौक, आझाद चौक.

वरील खिकाणी पालिका प्रशासनातर्फे मूर्ती स्वीकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी मूर्ती दान करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

Kolhapur : व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवून महाविद्यालयीन मुलाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कार व टेंम्पोचा अपघात, पाटबंधारे विभागातील अधिकारी ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून हुपरी परिसरातील पूरग्रस्तांसाठी साहीत्य प्रदान

Abhijeet Shinde

‘एफआरपी’ च्या तुकडय़ांसाठी ‘करारपत्र’

Abhijeet Shinde

…आणि तो युवा महोत्सव आर्याचा अखेरचा ठरला

Sumit Tambekar

सोने-चांदी कारागीर केंद्र, राज्य सरकारच्या कक्षेत

Sumit Tambekar
error: Content is protected !!