Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोना नसेल तरच जिल्ह्यात प्रवेशाचा आदेश रद्द : जिल्हाधिकारी दौलत देसाई

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्यातील एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोना नसल्याचे ‘आरटीपीसीआर’ किंवा ‘अँटीजेन’ चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी रद्द केले. त्यामुळे कोणत्याही अटीशिवाय परजिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापूरात प्रवेश करता येईल. परंतु शासनाच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी, तसेच अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही सुरुच राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी (दि.6) जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्यातील एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोना नसल्याचे `आरटीपीसीआर’ किंवा `अँटीजेन’चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आदेश काढले होते. परंतु या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी बुधवारी मागे घेतला. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना नसल्याच्या प्रमाणपत्राचे बंधन राहणार नाही. तसेच शासनाच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी व अलगीकरण, विलगीकरणाची कार्यवाही सुरुच राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

पुणे-मिरज रेल्वेच्या दुसऱ्या मार्गिकेचे भूसंपादन पूर्ण

datta jadhav

…अन्यथा दहावी-बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार

Abhijeet Khandekar

मिरवणुका, महाआरतीवर बंदी

Patil_p

कोल्हापूर : वळिवडे येथे बंद घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचे दागिने लंपास

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवसात पाच हजार अँटिजेन टेस्ट करणार : जिल्हाधिकारी

Archana Banage

पाचगावात पैशाच्या वादातून मारहाण, दोघा सावकारांना अटक

Archana Banage