Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह संख्या 507 वर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. शुक्रवारी (दि.29) रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 24 ने वाढली असून आजअखेर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 507 वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

56 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोशाळेत

सीपीआर, आयजीएमसह जिल्हयातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारसाठी दाखल असलेल्या देशांतर्गत 524 कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची तपासणी करून िस्क्रनिंग करण्यात आले आहे. तर 56 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

125 रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह

शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाकडे सुमारे 149 रुग्णांचा स्वॅब नमुना तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. यापैकी 125 रुग्णांच्य स्वॅब नमुना तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 24 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळलेला आहे.
यामुळे आजअखेर जिल्हयातील रुग्णसंख्या ही 507 वर पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे 385 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर 118 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले आहे. आजअखेर कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

21 ते 50 वयोगटातील 345 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 507 वर पोहोचली आहे. यामध्ये वयोगटानुसार रुग्णांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. 1 वर्ष – 1, 1 ते 10 वर्षे – 45, 11 ते 20 वर्षे – 65, 21 ते 50 वर्षे – 345, 51 ते 70 वर्षे – 50 तर 71 वर्षावरील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे.

Related Stories

कोल्हापूरच्या पोषण आहार पुरवठादाराला बजावल्या नोटिसा

Archana Banage

प्रकाशराव बोंद्रे यांचे निधन: सहकार, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड

Archana Banage

नांदणी नाका येथील डंपर चोरणाऱ्यास केली अटक

Archana Banage

गोकुळ शिरगाव एमआयडीसीत गव्याचे दर्शन

Archana Banage

आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोष स्वागत

Archana Banage

धोका वाढला : महाराष्ट्रात मागील 24 तासात 67,013 नवे रुग्ण; 568 मृत्यू

Tousif Mujawar