Tarun Bharat

कोल्हापूर : कोरोना रूग्णांसाठी रिक्षा ऍम्ब्युलन्स सेवा

आम आदमी पार्टीची वैद्यकीय सेवा : ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा : गरजूंना संपर्काचे आवाहन

प्रतिनिधी / कोल्हापूर

आम आदमी पार्टी अर्थात आप'च्या वतीने कोरोनाच्या रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा असणाऱया रिक्षा ऍम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवारी या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ना नफा ना तोटा तत्वावर देण्यात येणाऱया या सेवेचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहनआप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले आहे.

शहरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना ऍम्ब्युलन्सची गरज भासते. सर्वच रुग्णांना ही सुविधा परवडत नसल्यामुळे त्यांची हेळसांड होते, अनेकवेळेला वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून आम आदमी पार्टीच्या वतीने रिक्षा ऍम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱया ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा असणार आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर ही सेवा कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होणार आहे.

तसेच या रिक्षामधे सॅनिटायझेशनचा पंपही ठेवण्यात आला आहे. या सुविधेची गरज लागणाऱया रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रिक्षाचालक संघटनेचे विजय भोसले यांना 9850089441 व 9420295443 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप देसाई यांनी केले. उद्घाटन प्रसंगी संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, विशाल वाठारे, युवा उपाध्यक्ष मोईन मोकाशी, आप रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राकेश गायकवाड, बाबुराव बाजारी, मंगेश मोहिते, प्रकाश हरणे, आदी उपस्थिती होते.

 

Related Stories

`ईएसआयसी’साठी दहा कामगारांची अट रद्द करा

Abhijeet Khandekar

सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवू

Archana Banage

चाईल्डलाईनने उघडकीस आणले बालिकेवरील लैगिंक अत्याचाराचे प्रकरण

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोरोनाग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळावी

Archana Banage

रजपूतवाडीजवळील अपघातात दगड घडीव कामगार जागीच ठार

Abhijeet Khandekar

बंदुकीची गोळी झाडून घेऊन युवकाची आत्महत्या

Archana Banage