Tarun Bharat

कोल्हापूर : कोविड ड्यूटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करावे

Advertisements

कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

मुरगूड /वार्ताहर


14 सप्टेंबर 2020 च्या शासनादेशानुसार कोविड ड्यूटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करावे या मागणीचे निवेदन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिंदे -देसाई यांना देण्यात आले. कास्ट्राईब कल्याण महासंघाचे सचिव राजेंद्र कांबळे व जिल्हाअध्यक्ष सुरेश कांबळे यांनी अधिकाऱ्यांपुढे वस्तूस्थिती कथन केली.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब सर्वेक्षणासाठी सध्या मोठ्या संख्येने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना ना विमा कवच अथवा ना प्रत्यक्ष सर्वेक्षणावेळीची आवश्यक साधने. यामुळे असे सर्वेक्षण करणाऱ्यांना जिविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. पण स्थानिक प्रशासनाने ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ याप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना या कामात ओढले आहे. वस्तूतः प्रत्यक्ष शाळा चालू नसल्या तरी विद्यार्थी प्रवेश आणि ऑनलाईन शिक्षण हे शिक्षकाचे शाळेतील कामकाज चालूच आहे. स्थानिक प्रशासन आपल्या कामाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवून रिकामे झाले आहे.
24 जून 2020 आणि 17 ऑगस्ट 2020 रोजीचे शासन परीपत्रक विचारात घेऊन ज्या शिक्षकांची सेवा कोविड आजारासंबंधित कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली आहे अशा शिक्षकांना या कामकाजातून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत. त्याची जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी. याबाबतची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना लढवणार ५० ते १०० जागा

Abhijeet Khandekar

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Archana Banage

कळंबा तलाव ‘सुशोभीकरण’ लाल फितीत

Archana Banage

कशी आहे नारायण राणेंची शस्त्रक्रियेनंतर तब्येत; पाहूया डॉक्टर काय म्हणाले…

Kalyani Amanagi

दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संभ्रमात

Archana Banage

कोल्हापुरात 12 जागा रिपाइं लढवणार : आठवले

Archana Banage
error: Content is protected !!