Tarun Bharat

कोल्हापूर : खोतवाडीतील युवकाला बेदम मारहाण

वार्ताहर / यड्राव

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवराज अशोक खोत( वय वर्ष 30 रहाणार हनुमान मंदिर जवळ खोतवाडी​ तालुका हातकलंगले )या युवकाला पाच ते सहा इसमाने मागाच्या लाकडी माऱ्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक 1 रोजी रात्री दहाच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडली याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अंकुश आप्पासो शिंदे, सागर महादेव बडवे, ऋषिकेश बाबासो पाटील व इतर चार ते पाच अनोळखी इसमां​ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 1 रोजी युवराज खोत हे हॉटेल सेव्हन स्टार येथून घरी जात असताना रात्री दहाच्या सुमारास अंकुश शिंदे, सागर बडवे, ऋषिकेश पाटील व त्यांच्या साथीदारांनी यड्राव फाटा येथे त्यांना अडवून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अंकुश शिंदे यांनी हातातील लाकडी माऱ्याने​ डोकीत मारले त्यामुळे युवराज खाली कोसळला असता इतर साथीदाराने अचानकपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. या मारहानीत​ त्याच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत​ संशयितांना ताब्यात घेण्याचे काम शहापूर पोलिस करीत होते.

Related Stories

गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका – विजय भोजे

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगावात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू

Archana Banage

बालचमू रमले गड-किल्ल्यांच्या विश्वात

Archana Banage

महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक मनसे स्वबळावर लढणार

Archana Banage

धर्मांध शक्तींला बाजूला ठेवा-शरद पवार

Archana Banage

रत्नागिरी : महामार्गावर वाटूळ येथे अपघात, 5 जखमी

Archana Banage