Tarun Bharat

कोल्हापूर : गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार

प्रतिनिधी / गगनबावडा

गगनबावडा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोल्हापूर जिल्हा शिवसेना पुरस्कृत सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला.

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, रिसर्च फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णलयातील अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते व आरोग्य राज्यमंत्री राजेश पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला.

गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात माजी आमदार चंद्रदिप नरके यांच्या प्रयत्नातून ही अद्यावत सुविधा साधने उपलब्ध झाली आहेत. यावेळी तहसिलदार संगमेश कोडे, माजी सभापती बंकट थोडगे, युवानेते विनोद प्रभुलकर संजय पोतदार, रविंद्र सराफदार, विश्वनाथ पोतदार, बाळकृष्ण गावकर, वैदयकिय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. दाते, डॉ. अजय गवळी, डॉ. विजय सावंत इत्यादीसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

गोकुळचा आणखी एक ठरावधारक कोरोनाचा बळी

Archana Banage

पर्यायी विसर्जन मार्गाला 80 मंडळांचा पाठिंबा

Kalyani Amanagi

कोल्हापूर : सेनेचे खासदार उतरणार मनपा रणांगणात

Archana Banage

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार कायम

Archana Banage

तरूण भारत इफेक्ट : वारणेच्या जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त

Archana Banage

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या बदनामी करण्यासाठी खोटी फिर्याद – राजेश लाटकर

Archana Banage