Tarun Bharat

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतीत महिलाराज

प्रतिनिधी / गगनबावडा

गगनबावडा तालुक्‍यातील नुकत्‍याच निवडणुका झालेल्‍या 8 ग्रामपंचायतीसह उर्वरित 21 अशा एकूण 29 ग्रामपंचायतीच्‍या 2020 ते 2025 करीता सरपंचपदाचे आरक्षण त‍हसिल कार्यालयात आज चिठ्ठीद्वारे काढण्‍यात आले. गावगाडा  चालविण्याची सुत्रे तालुक्‍यातील  14 ठिकाणी महिलांच्याकडे येणार आहेत.

अनुसुचित जाती प्रवर्गासाठी 3 तर अनुसुचित जातीच्‍या महिला प्रवर्गासाठी 2 ग्रामपंचायती आरक्षित झाल्‍या आहेत. नागरीकांच्‍या मागास प्रवर्गासाठी 4 तर नागरीकांच्‍या मागास प्रवर्गातील महिलांसाठी 4 ग्रामपंचायती आरक्षित झाल्‍या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 8 ग्रामपंचायती आरक्षित झाल्‍या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्‍याने अनेकांचे लक्ष आजच्‍या सोडतीकडे लागून राहिले होते. मात्र आज सोडत जाहीर झाल्‍यानंतर काहींचे पत्‍ते कट झाले असून काहींना अनपेक्षितपणे लॉटरी लागली आहे.  

सकाळी ११ वाजता सरपंचपदाच्‍या आरक्षणाची सोडत तहसिल कार्यालयात काढण्‍यात आली. तहसिलदार संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार संजय वळवी,रोहिणी शंकरास, मंडलाधिकारी विवेक लुगडे,व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. आठ ठिकाणी याप्रमाणे निवडी निश्र्चित झालेल्या आहेत.तर उर्वरित २१ ग्रामपंचायतीत आपलाच सरपंच होण्यासाठी आतापासूनच वेगवान हालचाली होणार आहेत. 

29 ग्रामपंचायतीच्‍या सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

अनुसुचित जाती – साखरी / म्‍हाळुंगे, शेळोशी, मणदूर.

अनुसुचित जाती महिला – गगनबावडा, खोकुर्ले.

नागरीकांचा मागास प्रवर्ग – तिसंगी, साळवण, सांगशी-सैतवडे, वेतवडे.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – असळज, असंडोली, किरवे, कडवे.

सर्वसाधारण – मांडुकली, धुंदवडे, तळये बुद्रुक, लोंघे, वेसर्डे, बावेली, मार्गेवाडी, बोरबेट

सर्वसाधारण महिला – कातळी, खेरीवडे, कोदे बुद्रुक, निवडे, जर्गी, मुटकेश्‍वर / खडूळे, अणदूर, शेणवडे. 

Related Stories

कोलमडलेली वीज यंत्रणा सुरळीत करणारा `विठ्ठल

Archana Banage

आयसोलेशन हॉस्पिटलमधील लॅबटेक्निशियनला मुदतवाढ द्या

Archana Banage

कोल्हापूर : ‘कट-ऑफ डेट’चा उद्या फैसला

Archana Banage

मराठा समाजातील उद्रेक रोखण्यासाठी ‘ईडब्ल्यूएस’चा निर्णय : राजेंद्र कोंढरे

Archana Banage

पेठ वडगाव परिसरात स्वाभिमानीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Archana Banage

Kolhapur : बांधकाम कामगारांना 10 हजार दिवाळी बोनस जाहीर करावा

Abhijeet Khandekar