Tarun Bharat

कोल्हापूर : गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा रद्द करा

कोल्हापूरच्या कुंभार समाजाला दिलासा द्या : भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी / कोल्हापूर

2019 मध्ये आलेला महापूर आणि त्यापाठोपाठ आलेला कोरोना अशा दुहेरी संकटामुळे गेल्या तीन वर्षापासून कुंभार समाजाची अवस्था बिकट बनली आहे. एका वर्षी महापुरामुळे झालेले मूर्तींचे नुकसान आणि कोरोनाचे गंभीर संकट यामुळे मूर्ती बनवण्यासाठी बॅंकांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज फेडणे कुंभार बांधवांना अशक्य झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा राज्य शासनाने रद्द करावी, अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱयांना ई-मेलव्दारे निवेदनही सादर केले.

निवेदनात म्हटले आहे : गणेशोत्सव दोन महिन्यावर आला असता राज्यसरकारने मंडळांच्या मूर्ती 4 तर घरगुती 2 फुटांपर्यंत असाव्यात असे निर्बंध घातले आहेत. असे निर्बंध घालण्याआधी राज्य सरकारने कुंभार समाजाचा गांभीर्याने विचार करायला हवा होता, त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. पण असे न होता शासनाच्या या एकतर्फी निर्णयामुळे कुंभार समाजाला यावर्षीही आर्थिक फटका बसणार आहे. कुंभार बांधव आपल्या व्यवसायाची किंवा गणेशमूर्ती तयार करण्याची सुरवात जानेवारी महिन्यापासूनच करत असतात. आजच्या घडीला 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

त्यामुळे गतवर्षीच्या शिल्लक गणेशमूर्ती आणि यंदाच्या तयार 5 ते 10 फुटांच्या मूर्ती यांचे करायचे काय? झालेल्या नुकसानाची भरपाईचे काय? बँक कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असे अनेक प्रश्न आज कुंभार समाजासमोर आहेत. याकडे गंभीरपणे पाहत राज्य सरकारने गणेशमूर्तीवरील उंचीची मर्यादा रद्द करावी. या विषया संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांना या संबंधीचे निवेदन सादर केले आहे, असेही चिकोडे यांनी जिल्हाधिकाऱयांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar

कोल्हापूर : मयत व्यक्तीच्या उत्तर कार्यात सहभागी सात व्यक्ती पॉझिटिव्ह

Archana Banage

शहरात दुर्गामूर्तीचे उत्साहात स्वागत

Archana Banage

एक अनोखा कृतज्ञता सोहळा;अनाथ, वंचित मुले साधणार डॉ. सुनीलकुमार लवटेंशी संवाद

Archana Banage

उचगाव रेल्वे पुलावर चोरट्यांकडून व्यापाऱ्यांचे दीड लाख लंपास

Archana Banage

कोल्हापूर : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे चालक कोरोनाबाधित

Archana Banage