Tarun Bharat

कोल्हापूर : गांधीनगरमधून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

उचगाव / वार्ताहर

मैदानावर खेळायला गेलेल्या मनीषकुमार रामसेवक यादव या अकरा वर्षीय मुलाला अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद त्याचे वडील रामसेवक बाबूलाल यादव ( सध्या रा. मसोबा मंदिर शेजारी, गुरूनानक कॉलनी गांधिनगर, मूळ रा. रामपूर मुराद, ता उतरवला, जि. बलरामपुर, उत्तर प्रदेश) यांनी दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

रामसेवक यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मनीषकुमार घराच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर खेळावयास गेला होता. नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. त्याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे. या फिर्यादीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, अतिरिक्त पोलीसप्रमुख बालाजी काकडे प्रत्यक्ष गांधीनगर येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार शोध पथके नेमली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम व पोलिसांची पथके विविध ठिकाणी शोध घेत आहेत. दरम्यान, गांधीनगर येथील पंचगंगा नदी घाट परिसरात मंगळवारी अपहृत मुलाची कपडे व चप्पल शोध पथकातील पोलिसांना मिळाली आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून अपहरण की घातपात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

Related Stories

Raj Thackeray: लढणाऱ्या मनसैनिकाला हवे बळ!

Archana Banage

कळंबा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 70 टक्के मतदान

Abhijeet Khandekar

Almatti Dam : अलमट्टी धरणातून दुपारनंतर विसर्ग वाढवणार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कणेरीवाडीत शाळा सुशोभीकरण करण्याचा श्री गणेशा

Archana Banage

कोल्हापूर : पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत संशयास्पद वीस लाखाची रक्कम जप्त

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेला मिळणार कार्डियाक ऍम्ब्युलन्स

Archana Banage