वार्ताहर / उचगांव
करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शनिवारी नऊने वाढली असून ती 286 वर पोहोचली आहे. गांधीनगरमधील परिसरातील मृतांची संख्या आजअखेर आठवर पोहोचली आहे. कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतीच आहे.
गांधीनगर येथे शनिवारी सहा रुग्ण वाढले. उचगाव येथे दोन रुग्ण वाढले असून गडमुडशिंगी गावभागामधील एका 12 वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी तिच्या वडिलांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या घरातील बाकी सर्व जणांचा अहवाल निगेटिव आला आहे. वळीवडे व चिंचवाड येथील रुग्णसंख्या स्थिर आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची शनिवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (129), वळिवडे (63), उचगाव (55), गडमुडशिंगी (24), चिंचवाड (15). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 286 वर पोहोचली आहे.


previous post