Tarun Bharat

कोल्हापूर गारगोटी मार्गावर इस्पुर्लीनजीक अपघातात चिरमुरे विक्रेता ठार

चुये / प्रतिनिधी

कोल्हापूर-गारगोटी मार्गावरत पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उसाने भरलेल्या ट्रॉलीला  मोटर सायकल नेमागून धडक दिल्याने निगवे खालसा तालुका करवीर येथील चिरमुरे विक्रेते सुभाष शंकर काणेकर  वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला 

      मयत कांणेकर हे दररोज कळंबा परिसरामध्ये चिरमुरे विक्रेते म्हणून काम करतात नेहमीप्रमाणे ते कळंबा येथून  निगवे खालचा कडे जात होते इस्पु र्ली  पंपासमोर त्यांची दुचाकी आल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती त्या ट्रॉली ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीवर असलेले मयत शंकर कां नकेकर रस्त्यावर आपटले त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    अपघाताची माहिती समजतात इस्पुरली पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचा पंचनामा झाल्यानंतर  त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात साठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला

कांदेकर यांच्या पश्चात दोन मुले पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे  अपघाताची नोंद इस्पुरली पोलिसात करण्यात आलीहअधिक तपास पोलिस करत आहे

     हेल्मेट असते तर..

डोक्या ला जबर मार लागल्याने या अपघातात सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र नियमित दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सुभाष यांनी यावेळी हेल्मेट घातले नव्हते जर त्यांच्या डोक्याला हेल्मेट असते तर त्यांचा याठिकाणी जीव वाचला असता 

पोलीस धोकादायक वाहतुकीवर कारवाई कधी करणार?

कोल्हापूर गारगोटी मार्गावरती इस्पुरली पोलीसस्टेशनच्या हद्दीत पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आलेली शेतकरी, शेताकडे जाणारे शेतकरी ,अशा सर्वांवरती विनापरवाना वाहतुकीच्या कारणास्तव इस्पुरली पोलिसांच्या कडून कारवाई होते मात्र बेजबाबदारपणे रस्त्यावर उभी असणारी, ऊसाची ची वाहतूक करणारी वाहने धोकादायक स्थितीत वाहतूक करणारी उसाची वाहने ,यांच्यावर मात्र कारवाई होत नाही त्यामुळे निष्पाप बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे पोलिस जशी दुचाकीवर कारवाई करतात त्याच पद्धतीने अशा स्वरूपाच्या वाहनावर कारवाई करताना डोळेझाक का होते अशा स्वरूपाचे प्रश्न सामान्यांना पडत आहे त्यामुळे पोलिस आणि अशा अवैध वाहतुकीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Related Stories

मैत्रेय कंपनीतील परताव्यासाठी २ ऑक्टोबरला राज्यभरात धरणे आंदोलन

Archana Banage

प्लास्टिक वापरणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर कारवाई

Archana Banage

Kolhapur : एकरकमी एफआरपीचा मुद्दा गाजणार

Abhijeet Khandekar

‘महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची गरज’

Archana Banage

एसटी संपाला पाठिंबा म्हणून गाव केलं बंद

Archana Banage

आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोष स्वागत

Archana Banage