Tarun Bharat

कोल्हापूर : गोकुळकडून दूध संस्था कर्मचाऱ्यांना साडेनऊ लाख कोविड अनुदान

दूध संस्थांना  5 कोटी  3 लाख लाभांश वितरण

प्रतिनिधी / कोल्हापूर

 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेने कोविड -19 निधी उभा केला आहे. या योजनेत सहभाग घेतलेल्या प्राथमिक दूध संस्थांमध्ये काम कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 9 लाख 50 हजारचे शनिवारी वाटप करण्यात आले. माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरण झाले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. 

कोरोना कवच निधीसाठी गोकुळ दूध संघाने 15 लाख रुपये मदत दिली असून योजनेत सहभाग घेणेसाठी संघटनेने संस्था कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी रुपये 300 तर दूध संस्थेकडून प्रति कर्मचारी रुपये 300 निधी घेतला आहे. तसेच गोकुळ दूध संघाकडून 11 टक्के डिव्हीडंड पोटी 5 कोटी 3 लाख 25 हजार दूध संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवा निवृत्त तीन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, बाळासो खाडे, उदय पाटील, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस. एम. पाटील, दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, दत्तात्रय बोळावे, सुभाष गुरव इतर अधिकारी संस्था प्रतिनिधी उपस्थिती होते. 

असे दिले अनुदान
शासकीय रुग्णालय  10 हजार
खासगी रुग्णालय  30 हजार
मृत्यू झाल्यास    1 लाख
शस्त्रक्रीयेसाठी   15 हजार
नैसर्गिक, इतर कारणांमुळे मृत्यू  25,000

यामध्ये जिल्ह्यातील दूध संस्थेमधील 41 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचाराकरिता एकुण 6 लाख 20 हजार या पैकी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यामुळे 1 लाख असे एकूण 7 लाख 20 हजार, इतर शस्ञक्रीयेसाठी 2 कर्मचाऱ्यांना 30 हजार व नैसर्गीक किंवा इतर कारणांमुळे 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे प्रत्येकी 25 हजार  प्रमाणे  2 लाख असे एकुण 9 लाख 50 हजार अनुदानाचे वितरण करण्यात आले

Related Stories

कोकण-कोल्हापूरमध्ये ८ पट्टेरी वाघ

Archana Banage

पन्नास वर्षांनी त्यांनी घेतले पुन्हा ‘सातफेरे’!

Archana Banage

इचलकरंजीत चिकन ६५ च्या हातगाडी चालकाचा आत्महत्त्येचा प्रयत्न

Archana Banage

डॉ. माधव गोगटे यांचे निधन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : होसूर-किटवाड येथे महिलांवर कोल्ह्याचा हल्ला

Archana Banage

कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी; काँग्रेस स्वतंत्र लढणार : सतेज पाटील

Archana Banage