Tarun Bharat

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या योजना शेतकर्‍यांना नवसंजीवनी देणाऱ्या

चेअरमन रवींद्र आपटे यांचे प्रतिपादन

वार्ताहर / पुलाची शिरोली

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघाच्या सेवा सुविधांचा लाभ घेवून म्हैस दुधाचे उत्पादन वाढवावे. असे आवाहन चेअरमन रवींद्र आपटे यांनी केली. ते ता.पा येथील बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. विद्यमान जेष्ट संचालक विश्वासराव पाटील, उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोकुळ श्री स्पर्धा, जिल्हास्तरीय उत्तम प्रत, तालुकास्तरीय उत्तम प्रत, म्हैस जास्तीचा दूध पुरवठा व महिला संस्था यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

ते पुढे म्हणाले, जिल्हा दूध संघाच्या अनेक योजना उत्पादक शेतकर्‍यांना नवसंजीवनी देणारे आहेत. यामध्ये विशेषत वासरू संगोपन योजना ही अत्यंत प्रभावी असून जातिवंत जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये करून म्हैस दुधाचा जास्तीत जास्त दुध पुरवठा करून संघास सहकार्य करावे असे सांगितले. विश्वास पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघ नेहमी उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. महापूवर व कोरोनाच्या महासंकटामध्ये दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी, गोकुळचे प्रशासन, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. गोकुळची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी गोकुळच्या विविध स्पर्धेमध्ये सर्वांचा सहभाग असावा असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक घाणेकर यांनी गोकुळ संघाच्या सेवासुविधा या राज्यात नाहीतर देशात अग्रस्थानी आहेत. या सेवा सुविधांच्या आधारे हातकणंगले तालुक्यात परिवर्तन घडले आहे. अन्य संघाचा येथे मोठा पगडा होता. पण सध्या या तालुक्यात गोकुळ दूध संघास मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होत आहे. भविष्यात म्हैस दूध वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जनावरे खरेदीसाठी संघाची अनुदानाची योजना आहे. तसेच जातिवंत वासरू संगोपन योजना ही प्रभावी राबवणे आवश्यक आहे .

आभार संचालक उदयसिंह पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले. यावेळी माणगाव येथील दूध उत्पादक अनिल पारीसा मगदूम यांचा गाय दूध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जिजामाता महिला व मंगोबा घुणकी, हनुमान लाटवडे, दत्त तळंदगे, गोकुळ इंगळी,कृष्ण रांगोळी, किसान रुई आदी संस्थांना बक्षीस देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास दूध संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, उप व्यवस्थापक डी. डी. पाटील, बी. आर. पाटील, प्रताप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे यांच्यासह तालुक्यातील संस्थांचे चेअरमन पदाधिकारी व सचिव उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर शहर, करवीरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक!

Archana Banage

गॅस सिलिंडरची तब्बल 850 रुपयांना विक्री

Archana Banage

Kolhapur; बिद्री ‘च्या सहवीज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

Abhijeet Khandekar

राधानगरी तालुक्यात 27 ते 29 नोव्हेंबर रोजी फिरत्या लोकअदालतीचे आयोजन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : राशिवडे-चांदे रस्त्यावर शंभरहून अधिक मृत कोंबड्या

Archana Banage

वटवृक्ष रोपणातून शिवरायांच्या मावळ्यांचा जागर

Archana Banage
error: Content is protected !!