Tarun Bharat

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनकडून राज्यमंत्री यड्रावकरांचा सन्मान

प्रतिनिधी / जयसिंगपूर

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी ठरवीण्या बाबतचा शासन दरबारी अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ मिळवून देण्याकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शिरोळ तालुक्याच्यावतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सन्मान करण्यात आला, व युनीयनच्या वतीने राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभाराचे पत्र ही देण्यात आले>

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ मिळावी यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भेटून संघटनेच्या आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. यावर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यानी ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत अवगत करताना वेतनवाढी बाबत निर्णय घेतला जावा अशी मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार व ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेत त्यांना भरघोस पगारवाढ देण्याबाबतचा निर्णय घेतला, राज्यातील लाखो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून या पुढच्या काळात सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष गौसपाक मुलानी, राज्य संघटक दत्तात्रय चव्हाण, कार्याध्यक्ष सचिन चूडमुंगे, सतीश भोसले, अशोक पाटील, संजय चव्हाण, अरुण पकाली, सुरेश पाटील, जब्बार बाणदार, सतीश तिवडे, समुद्र कांबळे, अभिनंदन नरसगोंडा, अमोल देवाजे, राजू हलोंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते यांना पत्नी शोक

Archana Banage

देशामध्ये संविधानाप्रमाणे वागायचं नाही असंच ठरलेलं दिसतंय, प्रकाश आंबेडकरांची टीका

Archana Banage

JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर

Archana Banage

गॅस एजन्सीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक

Patil_p

पुणे-बेंगलोर महामार्गावर 20 लाखाचा पानमसाला जप्त,कर्नाटकातील दोघेजण ताब्यात

Archana Banage

पन्हाळा पुरवठा विभागात भष्ट्राचाराचा ‘अरुणोदय’

Archana Banage