Tarun Bharat

कोल्हापूर चित्रनगरीत `संत गजानन शेगाव’चे मालिकेच्या चित्रिकरणाला प्रारंभ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये `संत गजानन शेगावचे’ या मालिकेच्या चित्रिकरणाला प्रारंभ झाला आहे. चित्रनगरीत भव्य सेट उभारला असून बहुतांश कलाकार स्थानिक असल्याने कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. पुढच्या आठवड्यात एक मालिका कोल्हापुरात येणार असून 26 ते 27 सप्टेंबरला या मालिकेचे चित्रिकरण सुरू होणार आहे, अशी माहिती अभिनेता आनंद काळे यांनी दिली.

कोल्हापुरातील कलाकार, निर्मार्ते, दिग्दर्शक यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुरात चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. चित्रनगरीत सध्या मेहंदी है रचनेवाली',संत गजानन शेगावचे’ या दोन मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रनगरीत दोन्ही मालिकांचे भव्य सेट उभारण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर परिसरात`जीव माझा गुंतला’ या मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. कोल्हापुरातील स्थानिक कलाकार, सहाय्यक दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कॅमेरामन आदींना रोजगाराची संधी मिळालेली आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या आठवड्यात येणाऱ्या मालिकेचे निर्मार्ते, दिग्दर्शक यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत. नवीन मालिकेच्या चित्रिकरणाला 26 ते 27 सप्टेंबरला सुरूवात होणार आहे. या मालिकांचे चित्रिकरण किमान दोन ते तीन वर्षे कोल्हापुरात सुरू राहिल असा अंदाज स्थानिक कलाकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना सलग तीन वर्षे रोजगार उपलब्ध होणार आहे.

Related Stories

खडीने भरलेल्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटून अपघात

Archana Banage

कार व दुचाकीच्या अपघातात वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई यांचा मृत्यू

Archana Banage

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शुभम, सृष्टीची सुवर्णपदकी कामगिरी

Archana Banage

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दीपोत्सव

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात ऋण समाधान योजनेचा फज्जा

Archana Banage

वारणा चोरी ः सहायक फौजदार शरद कुरळपकरला चार वर्षांनी अटक

Archana Banage