Tarun Bharat

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू

Advertisements

प्रतिनिधी/जयसिंगपूर

कोरोना रूग्णांच्या संख्येत जयसिंगपूर शहर व परिसरात होत असलेल्या वाढीमुळे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर नगरपरिषदेमध्ये सर्व संबंधितांची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला आवशक्य त्या उपाय योजना व कार्यवाही करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर शासनाच्या आरोग्य विभाग व जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली.

आरोग्य राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांनी शहराच्या सर्व भागात तातडीने नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या. गरज भासल्यास खासगी डॉक्‍टरांच्याकडून सुद्धा मदत घ्यावी असेही सुचवले होते, याचाच भाग म्हणून आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर साहेब यांच्या आढावा बैठकीनंतर आम्ही मुख्याधिकारी टीना गवळी, तसेच उपस्थित नगरसेवक, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. खटावकर यांची नियोजनाबाबतची बैठक घेऊन आरोग्य सर्वेक्षण बाबतचे नियोजन गुरुवारीच दिवसभरात पूर्ण केले असल्याचे संजय यड्रावकर यांनी सांगितले.

संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये येत्या आठवड्याभरात नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील पथकाला स्थानिक डॉ. सतीश पाटील, डॉ. प्रवीण जैन व डॉ. हिरेमठ या मंडळींनी मी केलेल्या विनंतीवरून दहा तज्ञ लोकांची मदत दिली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या या पथका मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे हेतूने पी. पी. ई. किट व अन्य उपकरणांची मागणी आम्ही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली असता मंत्रिमहोदयांनी तातडीने २५० पी. पी. ई. किट,१५ थर्मल स्कॅनर,१५ पल्स ऑक्सीमायटर तातडीने नगरपरिषदला उपलब्ध करून दिले अशी माहितीही उपनगराध्यक्ष यांनी दिली.


Related Stories

#monsoon : कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌लर्ट, कोकणात मुसळधार सुरुच

Abhijeet Shinde

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार”

Sumit Tambekar

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची : शाहू महाराज

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी 23 रोजी परीक्षा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महावितरणमधील 730 कंत्राटी कामगार बेरोजगार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!