Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे १५ बळी, ५३६ बाधित

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात सोमवारी रात्रीपर्यत कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील चौघांचा समावेश आहे. कोरोना बळींची संख्या 420 वर पोहोचली आहे. सायंकाळपर्यत 690 कोरोना रूग्णांना डिसचार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 7 हजार 556 झाली आहे. तसेच 566 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येचा आकडा 15 हजारांवर गेला आहे. आजपर्यतची पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 15 हजार 273 झाली आहे.

जिल्हय़ात सोमवारी सायंकाळपर्यत 1 हजार 737 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 48 जणांचे स्वॅब घेण्यात आले. 701 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. सद्यस्थितीत 7 हजार 257 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत 690 जण कोरोनामुक्त झाले. सोमवारी जिल्हय़ात 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील तीन बत्ती, चार रस्ता चौकातील 75 वर्षीय वृद्धा, कारंडे मळा येथील 70 वषींय वृद्धा, शहापूर रोड येथील 76 वर्षीय वृद्ध, हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 45 वर्षीय महिला, तसेच शिरोळ तालुक्यातील शाहूनगर येथील 50 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील उचगाव येथील 40 वर्षीय पुरूषाचा तर अतिग्रे येथील केअर सेंटरमध्ये हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शहरातील कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिरोळ येथील 72 वर्षीय वृद्ध, महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये रविवार पेठेतील 52 वर्षीय महिला, दुधाळी येथील हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ ठाणे येथील 59 वर्षीय महिला, तसेच शुक्रवार पेठेतील 76 वर्षीय वृद्ध, नागाळा पार्क येथील हॉस्पिटलमध्ये पाचगाव येथील 63 वर्षीय वृद्ध, शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये नागाळा पार्क येथील 64 वर्षीय वृद्ध, शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील 67 वर्षीय वृद्ध आणि कोल्हापुरातील वर्षानगर येथील 69 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

आजपर्यत 7 हजार 596 जणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात सायंकाळपर्यत आरटीपीसीआर, सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 607 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 362 निगेटिव्ह तर 239 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 694 अहवाल आले. त्यापैकी 553 निगेटिव्ह तर 141 पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमधील 156 पॉझिटिव्ह आल्याने 536 नवे रूग्ण दिसून आले आहेत. आजअखेर 15 हजार 273 पॉझिटिव्हपैकी 7 हजार 596 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिह्यात 7 हजार 257 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.

सायंकाळपर्यंत प्राप्त 536 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा 3, भुदरगड 15, चंदगड 8, गडहिंग्लज 13, गगनबावडा 6, हातकणंगले 86, कागल 9, करवीर 56, पन्हाळा 8, राधानगरी 16, शाहूवाडी 10, शिरोळ 29, नगर पालिका क्षेत्र 80, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 139 व इतर 58 जणांचा समावेश आहे.

आजअखेरतालुका, नगरपालिकाआणिमहापालिकाक्षेत्रनिहायरुग्णसंख्यापुढीलप्रमाणे :
आजरा 249, भुदरगड 324, चंदगड 462, गडहिंग्लज 392, गगनबावडा 38, हातकणंगले 1611, कागल 279, करवीर 1649, पन्हाळा 482, राधानगरी 389, शाहूवाडी 395, शिरोळ 743, नगर पालिका क्षेत्र 3113, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 4759 असे 14 हजार 885 आणि इतर 388 असे 15 हजार 273 रुग्णसंख्या आहे. जिह्यातील 15 हजार 273 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 7 हजार 596 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 420 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 7 हजार 257 इतकी आहे.

जिल्हय़ातील आजपर्यतचे कोरोना बळी :
ग्रामीण भाग 150
नगर पालिका 155
कोल्हापूर महापालिका 99
अन्य 16
एकूण 420 बळी

Related Stories

कोल्हापूर : शिरोली दुमाला येथे गोठ्यास आग; सुदैवाने जीवित हानी टळली

Archana Banage

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद ऑनलाईन

Archana Banage

मराठा क्रांती मोर्चाची क्रांतीदिनी सोमवारी पुण्यात बैठक

Archana Banage

तपासातील पुरावे मिळणे अद्यापही बाकी : ऍड. विरेंद्र इचलकरंजीकर

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात देसाई यांच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पुन्हा हल्ला: कार पेटवत केली प्रचंड तोडफोड

Archana Banage

कोल्हापूर : नियमांचे उल्लंघन, इचलकरंजी पालिकेच्या नगराध्यक्षांसह ४५ नगरसेवकांना दंड

Archana Banage
error: Content is protected !!