Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे ११ बळी, ४९६ नवे रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनामुळे 11 जणांचा म़ृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 496 रूग्ण दिसून आले तर 459 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांचा आकडा 10 हजारांपर्यत पोहोचत आहे, ही सकारात्मक बाब आहे. आजपर्यत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 17 हजार 433 इतकी आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत शहरात कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 496 झाली आहे.

जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये शहरातील शिवाजी पेठेतील 60 वर्षीय वृद्धा, कसबा बावडा येथील 46 वर्षीय महिला, लक्ष्मीपुरीतील 73 वर्षीय वृद्ध, आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील नारायण नगर येथील 51 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. महाराणा प्रताप चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये शिवाजी पेठेतील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. महासेनिक दरबार हॉल केअर सेंटरमध्ये महाडीक कॉलनी येथील 52 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये राजारामपुरीतील 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तसेच जवाहरनगर येथील 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ताराबाई पार्क येथील 85 वर्षीय वृद्धाचाही कोरोनाने मृत्यू झाला. रंकाळा परिसरातीलड हॉस्पिटलमध्ये शुक्रवार पेठेतील 58 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. 11 पैकी 10 कोरोना मृत्यू हे शहरातील आहेत. शहरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 222 नवे रूग्ण मिळून आले तर आजपर्यतची कोरोना रूग्णसंख्या 5 हजार 407 झाली आहे. कोरोनाने 10 जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोना बळींची संख्या 130 झाली आहे.

आजअखेर 9 हजार 576 जणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर व सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 502 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 248 निगेटिव्ह तर 329 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 943 अहवाल आले. त्यापैकी 805 निगेटिव्ह तर 138 पॉझिटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील 194 पॉझिटिव्ह आले असे एकूण 661 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आजअखेर 17 हजार 433 पॉझिटिव्हपैकी 9 हजार 576 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 7 हजार 398 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.

सायंकाळपर्यंत मिळालेल्या 661 पॉझिटिव्ह रूग्णांत आजरा 7, भुदरगड 11, चंदगड 1, गडहिंग्लज 6, हातकणंगले 75, कागल 12, करवीर 101, पन्हाळा 35, राधानगरी 18, शाहूवाडी 8, शिरोळ 37, नगर पालिका क्षेत्र 103, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 222 व इतर 25 जणांचा समावेश आहे. आजअखेर तालुका,

नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी :
आजरा 290, भुदरग 366, चंदगड 474, गडहिंग्लज 428, गगनबावडा 39, हातकणंगले 1910, कागल 327, करवीर 1905, पन्हाळा 565, राधानगरी 428, शाहूवाडी 433, शिरोळ 879, नगर पालिका क्षेत्र 3547, महापालिका क्षेत्र 5407 असे 16 हजार 998 आणि इतर 435 असे 17 हजार 433 रुग्ण आहेत. त्यांपैकी 9 हजार 576 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 459 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 7 हजार 398 इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात समन्वयाचा अभाव

Archana Banage

Kolhapur : ऊस दरवाढ प्रश्नी आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Abhijeet Khandekar

कोल्हापूरात पुईखडी नजीक भीषण अपघात; 2 ठार 2 जखमी

Abhijeet Khandekar

केआयटीच्या 29 विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्राला रौप्यपदक प्रदान

Archana Banage

आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यास प्राधान्य द्या – राजेश क्षीरसागर

Archana Banage