Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात दिवसभरात २४५ पॉझिटिव्ह रूग्ण,इचलकरंजीत 2 बळी

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात सायंकाळी सात वाजेपर्यत 245 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आल्याने सामूहिक संसर्गाचा धोका स्पष्ट झाला आहे. हातकणगंले तालुक्यात सर्वाधिक शंभरावर रूग्ण असून त्यानंतर करवीर, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडीत रूग्णसंख्या वाढली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा पावणेदोन हजारांवर पोहोचला आहे. वाढत्या सामुहिक संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी जिल्हय़ातील शासकीय, महसुल कार्यालये सर्वसामान्यांसाठी पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्यात आली आहेत.

जिल्हय़ात गुरूवारी मध्यरात्री आलेल्या 17 पॉझिटिव्ह रूग्णात हातकणंगलेतील 4, करवीर तालुक्यातील 3, महापालिका क्षेत्रातील 3, शाहूवाडीतील 6, पन्हाळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आलेल्या 6 पॉझिटिव्ह रूग्णांत इचलकरंजीतील षटकोन चौक, लालनगर येथील 2, गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री आणि महागाव येथील 1, कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट येथील 1 आणि राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील 1 आहे.

पन्हाळा, चंदगड तालुक्यात एकाच दिवसांत रूग्णांत वाढ

शुक्रवारी दुपारी 1 वाजता आलेल्या 27 पॉझिटिव्ह रूग्णांत पन्हाळा तालुक्यातील 13, करवीर तालुक्यातील 9, चंदगड तालुक्यातील 1 आणि महापालिका क्षेत्रातील चौघे आहेत. दुपारी 2 वाजता आलेल्या 28 पॉझिटिव्ह रूग्णांत चंदगड तालुक्यातील 27, पन्हाळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दुपारी साडेतीन वाजता आलेल्या 52 पॉझिटिव्ह रूग्णांच्या रिपोर्टमध्ये हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील 47 आणि गडहिंग्लज तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे.

इचलकरंजीतील हॉटस्पॉटमध्ये 50 हून अधिक रूग्ण

सायंकाळी 5 वाजता 76 जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये इचलकरंजीतील लाखेनगर, बेपारी गल्ली, लंगोटे मळा, वेताळ पेठ, वृंदावन कॉलनी, प्रियदर्शिनी कॉलनी लालनगर येथील 40, हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील 4, शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील 6, करवीर तालुक्यातील उचगाव, गांधीनगर, कळंबा, वळीवडे येथील 15 आणि महापालिका क्षेत्रात शाहूपुरी, मंगळवार पेठ, दुधाळी परिसरातील 13 जणांचा समावेश आहे. पावणेसहा वाजता आलेल्या 20 पॉझिटिव्ह रूग्णांत कोल्हापूर शहरातील 7, करवीर तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 4, चंदगडमधील 1, हातकणंगले तालुक्यातील चौघांचा समावेश आहे.  अन्य 2 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील बिंदू चौक परिसरातील 1 अन् गांधीनगरातील 1 आहे. सायंकाळी 7 वाजता आलेल्या 17 पॉझिटिव्ह रूग्णांत करवीर तालुक्यातील 12, सांगलीतील 2, हातकणंगले तालुक्यातील 2, कोल्हापूर शहरातील 1 रूग्ण आहे.

तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष कामकाज बंद

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेत पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्याने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयात औषध फवारणी करण्यात आली. शुक्रवारी करवीर तहसील कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयाच्या दारांवर पुढील आदेशापर्यत अभिलेख कक्षातील कामकाज बंद राहणार असल्याचे फलक लावण्यात आले.

शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये घरोघरी तपासणी

शहरातील टिंबर मार्केट, राजारामपुरी, जाधववाडी, कदमवाडी, कसबा बावडा, फुलेवाडी, बोंद्रेनगर, सुर्वेनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात घरोघरी रूग्ण तपासणी मोहीम गतीमान केली आहे.

.जिल्हय़ातील कोरोनाची शुक्रवारी सकाळी 10 पर्यतची आकडेवारी

रूग्ण तपासणी   688

घेतलेले स्वॅब   396

दाखल रूग्ण    650

आलेले रिपोर्ट   770

पॉझिटिव्ह रूग्ण   55

निगेटिव्ह रूग्ण   648

कोरोनामुक्त     14

कोरोना बळी    0

एकूण पॉझिटिव्ह रूग्ण ः 1638

एकूण कोरोनामुक्त ः    948

Related Stories

शाहूवाडी पोलिसांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे वावडे

Archana Banage

कॉपी करताना सापडल्यास…; शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Archana Banage

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून सामुदायिक अभिवादन

Archana Banage

कोल्हापूर : जेवणात गुंगीचे औषध घालून यात्रेकरूंची लूट

Archana Banage

कोरोना कामातून ‘या’ कर्मचार्‍यांना मिळाली मुक्ती

Archana Banage

विवेकानंदचे माजी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे निधन

Archana Banage
error: Content is protected !!