Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५ हजारांवर

कोरोनाचे 30 बळी, 922 नवे रूग्ण, 462 कोरोनामुक्त, बळींची संख्या 1100 च्या उंबरठय़ावर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात गेल्या 24 तासांत कोरोनाने 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 90 झाली आहे. सायंकाळपर्यत 922 रूग्ण नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटीव्ह रूग्णसंख्या 35 हजार 552 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 35 हजारांवर गेली आहे. 462 रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सोमवारी दिली.

जिल्हय़ात सोमवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 443 जणांची तपासणी केली. त्यापैकी 1 हजार 398 जणांचे स्वॅब घेतले, 389 जणांची अँटीजेन टेस्ट केली. सध्या 11 हजार 257 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 2 हजार 497 रिपोर्ट आले. त्यापैकी 1 हजार 928 निगेटिव्ह तर 562 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 389 रिपोर्ट आले. त्यापैकी 314 निगेटिव्ह तर 285 पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्हय़ात कोरोनाने 30 जणांचा मृत्य़ू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिगाव सांगली येथील 74 वर्षीय पुरूष, सिद्धनेर्ली कागल येथील 50 वर्षीय पुरूष, घुणकी हातकणंगले येथील 60 वर्षीय पुरूष, आळते हातकणंगले येथील 60 वर्षीय पुरूष, कणेरीवाडी करवीर येथील 82 वर्षीय महिला, राजेंद्रनगर कोल्हापूर येथील 54 वर्षीय महिला आणि सावर्डे शाहूवाडी येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

शहर, जिल्हय़ातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये कागल येथील 49 वर्षीय पुरूष, जयसेंगपूर शिरोळ येथील 53 वर्षीय आणि 72 वर्षीय पुरूष, चिंचवाड करवीर येथील 49 वर्षीय पुरूष, रमणमळा न्यू पॅलेस येथील 62 वर्षीय पुरूष, माणगाव हातकणंगले येथील 80 वर्षीय महिला, सांगवडे करवीर येथील 69 वर्षीय पुरूष, इंगळी हातकणंगले येथील 40 वर्षीय पुरूष, पाटणे शाहूवाडी येथील 80 वर्षैय पुरूष, कळे पन्हाळा येथील 62 वर्षीय महिला, शाहूनगर कोल्हापूर येथील 49 वर्षीय पुरूष, पट्टणकोडोली हातकणंगले येथील 40 वर्षीय पुरूष, कुरणी चंदगड येथील 61 वर्षीय पुरूष, लक्कीकट्टी चंदगड येथील 65 वर्षीय पुरूष, बारडवाडी राधानगरी येथील 60 वर्षीय पुरूष, नवे पारगाव हातकणंगले येथील 70 वर्षीय पुरूष, शिरोळ येथील 70 वर्षीय महिला, पन्हाळा येथील 60 वर्षीय पुरूष, मोरेवाडी करवीर येथील 70 वर्षीय पुरूष, कळंबा करवीर येथील 69 वर्षीय महिला, हुपरी हातकणंगले येथील 86 वर्षीय पुरूष आणि शृंगारवाडी आजरा येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत 1 हजार 90 जणांचा बळी घेतला आहे. जिल्हय़ात 462 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यत 23 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 11 हजार 257 रूग्ण उपचार घेत आहेत.

शहरात गेल्या 24 तासांत 267 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11 हजार 282 झाली आहे. कोरोना बळींमध्ये ग्रामीण भागात 476, नगरपालिका क्षेत्रात 281, महापालिका क्षेत्रात 273 तर अन्य 59 अशा 1090 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ात गेल्या 24 तासांत आजरा 24, भुदरगड 55, चंदगड 25, गडहिंग्लज 20, गगनबावडा 2, हातकणंगले 76, कागल 45, करवीर 125, पन्हाळा 57, राधानगरी 29, शाहूवाडी 48, शिरोळ 30, नगरपालिका क्षेत्रात 81, कोल्हापूर शहर 267 आणि अन्य 38 असे 922 रूग्ण दिसून आले.

एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण 35552
बरे झालेले 23206
उपचारात 11257
एकूण बळी 1090

Related Stories

शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून

Archana Banage

गांधीनगरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या गोदामात चोरी

Archana Banage

कोल्हापूर : स्वस्तात सोने देतो असे सांगून अनेकांना गंडा घालणारा ‘डीजे’ पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Khandekar

ट्रक्टर ट्रॉली चोरी करणारे तीघे जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

दहावी-बारावी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संभ्रमात

Archana Banage

`अॅटो फायर बॉल’ करणार रेकॉर्ड रुमची सुरक्षा

Archana Banage