Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात 17 पॉझिटिव्ह, कोरोनाचा चौथा बळी

Advertisements

रूग्णसंख्या पोहोचली 400 वर,  पॉझिटिव्हमध्ये गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, शाहूवाडीतील रूग्णांचा समावेश, सीपीआरमधून 13 कोरोनामुक्तांना डिसचार्ज

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हय़ात बुधवारी दिवसभरात 17 पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने रूग्णसंख्या 400 वर पोहोचली. जिल्हय़ात कोरोनाने चौथा बळी घेतला. दरम्यान, सीपीआरमधून रात्री उशिरा 13 कोरोनामुक्तांना घरी पाठवल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

जिल्हय़ात बुधवारी बाधित शहरांतून 37 हजार 819 जण आले. त्यापैकी 25 हजार 332 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. तसेच 6 हजार 498 जणांना कोरोंटाईन पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्हय़ातील 20 तपासणी केंद्रांवर 1 हजार 144 जणांची तपासणी करून 177 जणांचे स्वॅब घेतले. त्यापैकी सीपीआर हॉस्पिटलमध्ये 270 जणांची तपासणी करून 45 स्वॅब घेतले. आयजीएम हॉस्पिटलमध्ये 104 जणांची तपासणी करून 2 स्वॅब घेतले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 120 जणांची तपासणी करून 2 स्वॅब घेतले. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 161 जणांची तपासणी करून 5 स्वॅब घेतले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 68 जणांची तपासणी करून 11 जणांचे स्वॅब घेतले. चंदगड कोरोना केअर सेंटरमध्ये 85 जणांची तपासणी केली. आजरा केअर सेंटरमध्ये 58 जणांची तपासणी करून 8 स्वॅब घेतले.

  राधानगरी कोव्हीड केअर सेंटरमध्ये 50 जणांची तपासणी करून 3 स्वॅब घेतले. हातकणंगले केअर सेंटरमध्ये 21 जणांची तपासणी केली. कागल केअर सेंटरमध्ये 38 जणांची तपासणी करून 26 स्वॅब घेतले. भुदरगड ग्रामीण रूग्णालयात 69 जणांची तपासणी करून 12 स्वॅब घेतले. पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात 72 जणांची तपासणी केली. शाहूवाडी ग्रामीण रूग्णालयात 74 जणांची तपासणी करून 55 स्वॅब घेतले. शिरोळ केअर सेंटरमध्ये 25 जणांची तपासणी केली. हातकणंगले एसजीआय केअर सेंटरवर 74 जणांची तपासणी करून 6 स्वॅब घेतले.  इचलकरंजीतील डीकेटीई केअर सेंटर 45 जणांची तर आणि गोकुळ शिरगाव येथील कोव्हीड केअर सेंटरवर 69 जणांची तपासणी केली.

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी

गडहिंग्लज येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोरोंटाईन असलेल्या 52 वर्षीय पुरूषाचा मंगळवारी दुपारी कोरोनाने मृत्यू झाला, त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणेनेही जिल्हय़ात तिसरा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यमनेट्टी येथील ही व्यक्ती 15 मे रोजी मुंबईहून गावी आली होती.

बाधित शहरातून आलेले 37,819 ः त्यापैकी होम कोरोंटाईन 25,332

होम कोरोंटाईन पूर्ण झालेले 3 हजार 498

तपासणीसाठी आलेले स्वॅब 21,506

निगेटिव्ह              17,227

पॉझिटिव्ह                  400

प्रलंबित रिपोर्ट          ः    3814

नव्याने मागवलेले स्वॅब    ः      14

नाकारलेले स्वॅब         ः   51

………………………………………………..

खासगी लॅबमधील स्वॅब       61

निगेटिव्ह रिपोर्ट             59

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रूग्ण   400

कोरोनामुक्त झालेले रूग्ण      20

कोरोनाचे बळी               4

शिल्लक रूग्ण              376

हायरिस्क रूग्ण              37

यमेहट्टी येथील उपचारासाठी दाखल एकाचा कोरोनाने मृत्यू

गडहिंग्लज तालुक्यातील यमेहट्टी येथील 52 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी गडहिंग्लजजवळील शेंद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. बुधवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब अहवाल सायंकाळी आल्यानंतर कोरोना तो sकोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यातील चन्नेकुप्पी पाठोपाठ यमेहट्टी येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण आहे.

यमेहट्टी येथे मुबंई घाटकोपर येथून खासगी बसने आलेल्या व्यक्तींना गावात काजू फॅक्टरी येथे संस्थात्मक विलगिकरण केले होते. ते कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात तपासणी करून आले होते. त्यांचे अहवाल प्रलंबित होते. त्यातील मंगळवार 19 मे रोजी 20 वर्षीय युवक व 45 वर्षीय व्यक्ती अशा दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर खबरदारी घेत गावाच्या सीमा बंद केल्या होत्या.

बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी शेंद्री माळावरील कोविड केअर सेंटर येथे नेले होते. येथे मधुमेह, मणक्याचा त्रास सुरु झाल्यावर उपचारासाठी सोमवारी त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. बरे वाटल्यानंतर पुन्हा कोविड सेंटरला पाठवले होते. बुधवारी सकाळी पुन्हा त्रास सुरु झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. येथेच त्यांचा मृत्यू झाला. हृदय विकाराने मृत्यू झालेल्या या व्यक्तीचा मृत्यूपुर्वी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मृतावर यमेहट्टी येथे पूर्ण दक्षता घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवसात गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेल्याने तालुका हादरला असून दक्षतेचे आदेश दिले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तीत लक्षणे दिसत नव्हती. याचा विचार करत तालुक्यातील 50 वर्षे वयावरील व्यक्तींपैकी रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर, दमा असणाऱयांची माहिती संकलित केली जात आहे. 10 वर्षाखालील बालकांची माहिती जमा केली जात आहे. ही माहिती संकलित करुन त्यावर लक्ष ठेवणार आहे. शरद मगर गटविकास अधिकारी गडहिंग्लज

Related Stories

वंदनगडावर शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने केले शिवकार्य

Patil_p

शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाला निधी देण्यासाठी प्रयत्नशील – आ.आसगावकर

Sumit Tambekar

उद्या जाहीर होणार राज्यासाठी नवे निर्बंध : उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Sumit Tambekar

शहरात तोतया पोलीसांचा धुमाकूळ

Sumit Tambekar

बजरंग पाटील, सर्जेराव पाटील, शिंपी स्पर्धेतून बाहेर

Kalyani Amanagi

Kolhapur : दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांना येणार गती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!