Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हापरिषदेत सभापती निवडीत हातकणंगलेला डबल लॉटरी

प्रतिनिधी / कुंभोज

कुंभोज जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी बिनविरोध तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रुकडी जिल्हापरिषद सदस्य पद्माराणी पाटील यांची निवड झाल्याने हातकलंगले तालुक्याला दोन सभापतिपदी मिळाल्याने रुकडी व कुंभोज परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यामुळे हातकणंगले तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. परिणामी प्रवीण यादव व पद्माराणी पाटील यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून परिसरात आनंद व्यक्त केला. प्रवीण यादव यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला पुन्हा एकदा उजाळा मिळणार असून जिल्हा परिषद सदस्य व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पद्माराणी पाटील यांचा मतदारसंघाशी असणारा संपर्क यामुळे हातकणंगले तालुक्यात पुन्हा एकदा विकासकामांची लाट येण्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या तीन वर्षातील कारभाराला फाटा देऊन सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी वर्गाला विचारात घेऊन आपण विकास कामे करू असे आश्वासन नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव व महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील यांनी सत्कार प्रसंगी दिले. यावेळी खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, मुरलीधर जाधव माजी आमदार सत्यजित आबा सरूडकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर आदी मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरात जय भवानी जय शिवाजी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणेने परिसर दणाणून निघाला होता.

Related Stories

कणेरीत गवारेड्यांचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट!

Archana Banage

…तर अलमट्टी वाढवण्याचा प्रयत्न हाणून पाडू: राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage

शिरोली फाटा येथे मोटरसायकल ट्रक अपघातात युवती जागीच ठार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर महापालिका निवडणूक : आरक्षणाचा दिग्गजांना फटका, शेजारच्या प्रभागावर डोळा !

Archana Banage

इचलकरंजी पालिकेतील बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

Archana Banage

आरक्षणाचे `’स्ट्रक्चर’च बदलणार

Archana Banage