Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांची नावे जाहीर

शिवसेनेला तीन, तर अपक्ष सदस्याला एक पद

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर केली.

यामध्ये खासदार प्रा. संजय मंडलिक गटाच्या शिवानी भोसले यांना महिला व बालकल्याण, आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना आरोग्य व बांधकाम, माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या कोमल मिसाळ यांना समाज कल्याण व अपक्ष रसिका अमर पाटील यांचे नाव शिक्षण व अर्थ सभापती पदासाठी निश्चित करण्यात आले.

मंगळवारी सकाळी शासकीय विश्रामगृहमध्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सभापती पदांसाठी चार नावांची निवड करण्यात आली. त्यानुसार शिवसेना तीन पदे व अपक्ष सदस्याला एक पद देण्यात आले. या नावांची निवड केल्यानंतर महा विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर येऊन निवड केलेल्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. भाजप आघाडीकडून या चारही सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, जयंत असगवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

जाहीर प्रचाराला पूर्णविराम, छुपी रणनिती सुरु

Archana Banage

गोकुळ शिरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; बालकाच्या तोंडाचा घेतला चावा

Archana Banage

किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात याव आणि अंबाबाईचे दर्शन घ्यावं -हसन मुश्रीफ

Archana Banage

कसब्याची जागा भाजपकडून जाईल

datta jadhav

“रूंजी”चा अपघाती मृत्यू; मनाला “चटका” लावून गेला !

Abhijeet Khandekar

वारणा चोरी ः सहायक फौजदार शरद कुरळपकरला चार वर्षांनी अटक

Archana Banage