Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल: मतपेटीत चिठ्ठ्या, मतदारांनी लिहलं तरी काय?

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (ता. ७) रमण मळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत काही गटांत धक्कादायक निकाल लागले आहेत. काही विद्यमान संचालकांचा पराभव झाला आहे. सत्ताधारी विरुध्द शिवसेना यांच्यात लढत असून, निकालाबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. दोन मंत्री, दोन्ही खासदार व अनेक आमदारांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. दरम्यान, आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतपेटीत मतदारांनी टाकलेल्या चिट्ठ्या आढळून आल्या आहेत.

यामध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सुरुवात होताच मतपेटीत पन्नास रुपये ओवाळणी म्हणून दिले आहेत.

काय लिहले आहे ‘या’ चिट्ठीत

उद्यापासून समरजित दादा सर्वसामान्य लोकांची डोके फुटण्यासाठी तालुका फिरायला मोकळे. त्यांचं साधलं तसेच नेत्यांच्या पोटाचे साधले.

गोकुळ झालं आता केडीसी झाली. आता सर्वसामान्य कार्यकर्त्या पंचायत समिती झेडपी बसा आता

मुश्रीफ साहेबांच्या जवळ जाऊन काम अडवायच एक टोळकं आहे. तसेच मोठं टोळकं स्वतःच साधण्यासाठी सामान्य माणसाचे काम आडवणार. तेच समरजित दादाच्या जवळचे आहेत.

सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर आगपाखड करीत असले तरी निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक असल्याने बँकेवर कायमपणे प्रशासक असणे आवश्यक आहे

Related Stories

कोल्हापूरचे खराब रस्ते बिघडवताहेत स्वास्थ्य

Kalyani Amanagi

महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला

datta jadhav

कंगना राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Abhijeet Shinde

‘यंत्रमाग व्यवसायाला व्याज सवलत देण्याचे सहकार बँकांना आदेश द्यावे’

Abhijeet Shinde

एकनाथ शिंदे गटाला विलीन व्हावे लागेल,अन्यथा…; निलम गोऱ्हे

Abhijeet Khandekar

ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!