Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : आमदार विनय कोरे नाराज ?

आमदार कोरेंनी जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची बैठक अर्ध्यावर सोडली

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी अध्यक्षनिवड आज होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर बैठकीला सुरुवात झाली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नूतन संचालक माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह आमदार आणि अन्य संचालक या बैठकीला उपस्थित आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ही बैठक सुरु असतानाच आमदार विनय कोरे बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर आले.

दरम्यान आमदार कोरे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षपदासाठी सामंजस्यपणाने चर्चा झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार हे त्यांनाच विचारा, असे म्हणत आमदार विनय कोरे यांनी बैठकीतून माघार घेतली आहे. आमदार कोरे बैठक अर्ध्यावरच सोडून गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील १९९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित तर ४ बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोरोनामुळे ३०९ विद्यार्थी पोरके

Abhijeet Shinde

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई?

Abhijeet Shinde

पंचगंगेची वाटचाल इशाऱ्याकडे….

Abhijeet Shinde

मराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक

Sumit Tambekar

मलकापूर आगारातील निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सर्व कर्मचारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!