Tarun Bharat

कोल्हापूर :जिल्हा बंदीचे उल्लंघन करत सहा जणांचा हिंगणगावात प्रवेश

वार्ताहर/कुंभोज

हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे जिल्हा बंदीचे आदेश असतानाही जवळजवळ सहा नागरिकांनी काल रात्री हिंगणगाव येथे प्रवेश केला. हे नागरिक मुळचे हिंगणगावचे असून कामानिमित्त ते काही वर्षापासून इस्लामपूर कराड परिसरात वास्तव्यास आहेत.

सध्या इस्लामपूर परिसरात कोरोनाने थैमान घातला असून सर्व स्तरावर कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. परिणामी सदर जिल्हा बंदीचे उल्लंघन करून सदर नागरिकांनी हिंगणगाव येथे प्रवेश केला. याबाबत काही नागरिकांनी ग्रामपंचायत हिंगणगाव, आरोग्य विभाग व हातकणगले पोलीस स्टेशन यांना सदर घटनेची माहिती कळवली. परिणामी सदर नागरिकाना होमक्वारंटाईन करून घेण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेसाठी त्यांना तारदाळ येथील सरकारी दवाखान्यात होमक्वारंटाईन करण्यात आले.

संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या कडक कारवाई करण्यात येईल असेही आवाहन हिंगणगाव पोलीस पाटील, व हातकणगले पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा बंदीचे आदेश असतानाही सदर नागरिकांनी कोणत्या मार्गे गावात प्रवेश केला हा सध्या चर्चेचा विषय असून अनेक ठिकाणी रस्ता बंद असूनही इतर जिल्ह्यातील नागरिक अजूनही गावात प्रवेश करत असल्याने नागरिकात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Related Stories

लसीकरणानंतर सेल्फीची क्रेझ

Patil_p

पुण्यात 12 तासात कोरोनाचे 5 बळी

prashant_c

‘पीएम-किसान’चे कोल्हापूरचे काम असमाधानकारक !

Archana Banage

विदर्भातील निवडणुकीसाठी सतेज पाटील `स्टार प्रचारक’

Archana Banage

”कोरोनानंतर जगावर आणखी एका महामारीचं संकट येईल”

Abhijeet Khandekar

मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांचे प्रत्युत्तर

Tousif Mujawar