Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅंटच `ऑक्सिजन’वर !

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची मागणी : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन : कोल्हापूरसाठी आवश्यक लस पुरवठा करण्याची विनंती

कोल्हापूर / संजीव खाडे

पुण्याहून होणारा लिक्विड ऑक्सिजनचा (द्रवरूप ऑक्सिजन) पुरवठा बंद झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन (वायूरूप ऑक्सिजन) निर्मिती करणारे प्लॅंट बंद पडले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र या प्लांटमधील ऑक्सिजनची निर्मिती थांबल्याने शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल्स अडचणीत आली आहे. येत्या दोन दिवसांत जर लिक्विड ऑक्सिजन मिळाला उपलब्ध झाला नाही तर खासगी हॉस्पिटल्स अवस्था कठिण बनण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शासकीय हॉस्पिटल्ससह महापालिका, नगरपालिका हॉस्पिटल्सना शासनातर्फे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात तर ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी केली गेली आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प आहे. याच पद्धतीचा प्रकल्प कोल्हापूर महापालिका आययसोलेशन हॉस्पिटलमध्ये उभारत आहे. मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये लागणारा ऑक्सिजन संबंधित हॉस्पिटल्स खासगी गॅस कंपन्यांकडून खरेदी करत असते. कोल्हापूर जिल्हÎात चार, पाच गॅस कंपन्यांचे ऑक्सिजन प्लांट आहे. या ठिकाणी लिक्विड फॉर्ममधील ऑक्सिजनवर प्रक्रिया करून वायूरूपातील ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. हा ऑक्सिजन खासगी हॉस्पिटलना पुरवला जातो. या प्लांटमध्ये 13 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा मागणीनुसार केला जातो.

पुण्याहून होणारा लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा बंद

कोल्हापूरच्या गॅस कंपन्यांच्या ऑक्सिजन प्लांटना पुण्यातील आयनॉक्स नामक कंपनीकडून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. या कंपनीचे टँकर मागणीनुसार पुरवठा करतात. या सर्व प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कंपनीच्या लिक्विड ऑक्सिजनच्या निर्मिती प्रकल्पावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी पूर्णपणे ताबा घेतला आहे. हे अधिकारी राज्यभरातून येणाऱया खासगी गॅस कंपन्यांच्या लिक्विड ऑक्सिजनच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा तक्रारी गॅस कंपन्यांचे मालक करत आहेत. पुण्याहून लिक्विड ऑक्सिजन मिळत नसल्याने त्याचा परिणाम राज्यातील इतर प्लांटबरोबरच कोल्हापूरच्या प्लांटवरही झाला आहे.
…तर कोल्हापुरात दोन दिवसांत गंभीर स्थिती

कोल्हापूर जिल्हÎात कागल एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी या एमआयडीसीत मिळून चार ते पाच मोठे गॅस प्लांट आहेत. यातील बहुतांश प्लांटमधील लिक्विड ऑक्सिजन संपला आहे. सध्या कोरोनामुळे खासगी हॉस्पिटलकडून दररोज ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. पण लिक्विड ऑक्सिजनचा संपलेला साठा आणि पुण्याहून बंद असलेला पुरवठा अशी स्थिती सध्या आहे. ती जर दोन दिवस अशीच राहिली तर खासगी हॉस्पिटलची अवस्था बिकट होण्याची भीती प्लांटमालकांनी व्यक्त केली.

शून्य साठा आणि निर्मितीही शून्य

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील एका प्लांटवरील लिक्विड ऑक्सिजनचा साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे ऑक्सिजनचे उत्पादन बंद आहे. साठा शून्य आणि निर्मितीही शून्य यामुळे संबंधित प्लांट मालकाने परिस्थिती ओळखून जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांना पत्र पाठवून लिक्विड ऑक्सिजनची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱयांनीही या संबंधात पुण्यातील कंपनीशी संपर्क करून लिक्विड ऑक्सिजन पाठविण्याचे आवाहन केले होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सद्यःस्थितीवरून दिसते. त्यामुळे यामध्ये जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीही लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात खासगी हॉस्पिटलकडून मोठÎा प्रमाणात ऑक्सिजनची मागणी येत आहे. पण लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठाच आम्हाला होत नसल्याने ऑक्सिजन तयार करून तो पुरवणे अशक्य बनले आहे. अशीच स्थिती राहिली तर दोन तीन दिवसांत परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. – राजेंद्र बिराजदार, श्री महालक्ष्मी ऑक्सिजन, गोकुळ शिरगाव एमआयडीसी

Related Stories

नागाळा पार्कात डांबर गाडीला आग; जिवीत हानी नाही

Abhijeet Khandekar

उचगावात माजी सैनिकांच्या पत्नी लता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

खोची येथील घटनेतील आरोपीविरोधात २२२ पानाचे दोषारोपपत्र दाखल

Archana Banage

उचगावात बंद घराचे कुलूप तोडून सव्वादोन लाखांची चोरी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

Archana Banage

दारूच्या नशेत हसूर बुद्रुक येथील तरुणाची आत्महत्या

Archana Banage