Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळाला सांगली जिल्ह्यातील भाजीपाला विक्रेत्यांची मदत

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरातील सर्वसामान्य भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत लांडग्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळाला आर्थिक हातभार लावण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. जनसेवा फळे-भाजीपाला संघटनेच्या पुढाकाराने संजय नगर बाजारांमध्ये हा निधी मेंढपाळाला सुपूर्द करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्‍यातील राशिवडे गावच्या रंगराव बाबू जोंग या वयोवृद्ध मेंढपाळाने पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे एका शेतात आपला कळप उतरवला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास मेंढपाळ बेसावध असताना लांडग्यानी केलेल्या हल्ल्यात बारा शेळ्या दगावल्या होत्या. या गंभीर संकटात समाजाकडून आपल्याला मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. याच गावात राहणारे जनसेवा भाजीपाला संघटनेचे सचिव अजित राजोबा यांना त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. ही बाब त्यांनी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या कानावर घातली. काटकर यांनी संघटनेच्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून दगावलेल्या मेंढ्यांची छायाचित्रे आणि मदतीचे आवाहन केले. त्याला भाजीपाला विक्रेत्यांनी जोरदार प्रतिसाद देत अल्पावधीतच रक्कम जमवली.

बुधवारी सायंकाळी संजय नगर येथील आठवडा बाजार मध्ये जन्मलेली सात हजार रुपयांची रक्कम मेंढपाळकडे अध्यक्ष शंभूराज काटकर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, उपाध्यक्ष कैस अलगुर, सचिव अजित राजोबा यांच्या हस्ते आणि संचालक अभय म्हारगुडे, अजय दुधाळ, संभाजी काळेल, लताताई दुधाळ, लता ताई पाटील, दादा लोखंडे, नामदेव धायगुडे, सौ सुतार, सौ. कलाल, सौ. सरगर, सखु ताई मासाळ, धनाजी चव्हाण विजय माळी, निसार बागवान प्रशांत शिकलगार, शंकर चांदकवठे, राजू नरळे धनाजी कोळपे सचिन कोळेकर यांच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आली. या मेंढपाळाला कोणी मदत करणार असतील तर त्यांनी कोणत्याही आठवडा बाजारात जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन शंभूराज काटकरांनी केले आहे

Related Stories

सांगली : बोरगाव – रेठरे हरणाक्ष बंधारा पाण्याखाली

Archana Banage

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करा

Archana Banage

मिरजेतील ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दंड

Archana Banage

बेळंकीतील पोलीस कुटुंब आत्महत्या प्रकरणी 14 जणांवर सावकारीचा गुन्हा

Archana Banage

सांगली : शांतिनिकेतनमध्ये साकारणार जिल्ह्यातील लेखकांचे ग्रंथदालन

Archana Banage

सांगली : मिरजेत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने फर्निचर व्यावसायिकाचा मृत्यू

Archana Banage