Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरणाची वेळ वाढणार

ऑनलाईन टीम / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांची लसीकरण वेळ वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता शहराबरोबरच ग्रामीण भागातील केंद्रांवर देखील सकाळी सात ते संध्याकाळी दहा या वेळेत लोकांचा लसीकरण होणार आहे.ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून लसीकरणासाठी पुन्हा एकदा नागरिकांची गर्दी होते आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसाला पाच ते दहा हजारांपर्यंत आलेला लसीकरणाचा वेग पुन्हा 40 हजारांवर गेल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यसीमांवर प्रवाशांची तपासणी केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

सुरळीत वीज पुरवठ्य़ासाठी महावितरण ‘अलर्ट’

Archana Banage

कोल्हापूर : मोफत सीएनसी, व्हीएमसी मशिन प्रशिक्षणास प्रारंभ

Archana Banage

ट्रक्टर ट्रॉली चोरी करणारे तीघे जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

माजी आमदार चंद्रदीप नरके शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात!

Archana Banage

कोल्हापूर : दोन्ही डोस घेतलेल्यांत फिफ्टी-फिफ्टी

Archana Banage

बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुचं; शाहूवाडी तालुक्यात पुन्हा शेळी आणि वासरु फस्त

Abhijeet Khandekar