Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांची उद्या घंटा वाजणार

जिल्ह्यातील 2059 शाळांमधील विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत. कोल्हापूर शहरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या 112 शाळा आणि जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या 1947 अशा एकूण 2059 शाळांची आज घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तब्बल पावनेदोन वर्षांनी विद्यार्थी व शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट होणार आहे. विद्यार्थ्यांची आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर देवून स्वागत केले जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण विभागांनी व्हीसीव्दारे मुख्याध्यापकांना शाळा कशा सुरू करायच्या याबद्दल सूचना दिल्या आहेत. ज्या शिक्षकांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, त्या शिक्षकांचे लसीकरण त्वरीत करून घ्यावे. शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन पूर्ण झाले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अध्यापन, अध्ययनाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. एकूणच ऑनलाईन शिक्षणात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा, खेळण्या-बागडण्याचा आनंद मिळणार आहे. महापालिकेचे आठवी ते बारावी व जिल्हा परिषदेचे पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागताची शाळा प्रशासनाने तयारी केली आहे.

शिक्षणोत्सव साजरा करणार

कोरोनानंतर नव्याने शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी पालक, शिक्षक, पदाधिकारी, अधिकारी यांनी शाळांना आवश्यक सहकार्य करून शिक्षणोत्सव कार्यक्रम यशस्वी करावा. संपूर्ण शालेय जीवन कोरोनामुक्त होवून यशस्वीरित्या शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

Related Stories

Kolhapur : लेसरचा प्रकाशझोत पडला महागात; गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर नेत्र रूग्णांत वाढ

Abhijeet Khandekar

दिव्यांग बांधवांनो, मतदार नोंदणी करा – ‘सक्षम’चे आवाहन

Archana Banage

गडहिंग्लजच्या मुस्लिम समाजाचा क्रांतीकारक निर्णय

Abhijeet Khandekar

जमत नसेल तर सत्ता सोडा,चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Archana Banage

करंजफेणजवळील धावडा खिंड येथे भूस्खलन, प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत

datta jadhav

Kolhapur; बाजारभोगावच्या बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी; चाळीस दुकाने पाण्याखाली

Abhijeet Khandekar