Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील २७५ गावांचा ड्रोन सर्व्हे पूर्ण

करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यांचा समावेश, ८०९ गावात मिळणार प्रॉपर्टी कार्ड
दीड वर्षात होणार सर्व्हेक्षण पूर्ण, भूमी अभिलेख विभागाकडून काम सुरु

प्रवीण देसाई / कोल्हापूर

जिल्ह्यातील ८०९ गावातील गावठाणांमधील लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडून मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये करवीर, कागल व हातकणंगले तालुक्याच्या ड्रोन सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. नुकतेच शिरोळ तालुक्यात ड्रोन सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हे सर्व्हेक्षण दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकूण १२३१ पैकी ४२२ गावातील गावठाणांना यापूर्वीच प्रॉपर्टी कार्ड मिळालेले आहे. ऊर्वरीत ८०९ गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. नोव्हेंबर २०२० ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. यामध्ये आतापर्यंत करवीर, कागल व हातकणंगले तालुक्यातील २७५ गावांचे ड्रोन सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील १२६, कागल तालुक्यातील ८६ व हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांचा समावेश आहे. तसेच करवीर तालुक्यातील ५४, कागल तालुक्यातील ३९ व हातकणंगले तालुक्यातील ४ गावांच्या सीमांकणाचे काम पूर्ण झाले अहे. या गावठाणांमधील संबंधित व्यक्तिच्या जागेचा नकाशा, हद्दी, क्षेत्र निश्चित करण्यात आले.

आठवड्याभरापूर्वी ८ फेब्रुवारीपासून शिरोळ तालुक्यातील ड्रोन सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व्हेक्षणाचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे उद्दीष्ट आहे.

ड्रोन सर्व्हेक्षणाचे फायदे…

गावठाणातील प्रत्येक मिळकतेचे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे

ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन आदीसाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ता कराच्या व्यापीत येतील

गावठाणांच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती, सार्वजनिक मिळकतीच्या जागा, मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होऊन जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध होतील

गावठाणांमधील मिळकतींच्या हद्दी व क्षेत्रामुळे होणारे वाद कमी होतील

ड्रोन सर्व्हेक्षणासाठी शिल्लक गावे

तालुका         सर्व्हेक्षण न झालेली गावे

गडहिंग्लज         ५५
आजरा            ७७
चंदगड             १३७
राधानगरी           ९०
भुदरगड             ९८
गगनबावडा           ३९
पन्हाळा              ८६
शाहुवाडी             १२२
शिरोळ                ०४

केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत ज्या गावठाणांचा सर्व्हे झालेला नाही. त्यांचा सर्व्हे सुरु आहे. करवीर, कागल व हातकणंगले तालुक्यातील ड्रोन सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून सध्या शिरोळ तालुक्याचे काम सुरु आहे.

-वसंत निकम, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, कोल्हापूर

Related Stories

‘दौलत’च्या तोडग्याने शेतकरी समाधानी

Archana Banage

कोल्हापूर : लॉकडाऊन निर्बंधात शिथिलता नाही : जिल्हाधिकारी

Archana Banage

स्वाभिमानाचे शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन

Archana Banage

अब्दुल लाट येथे मोकाट घोड्यांनी घेतला अनेकांचा चावा

Archana Banage

पद्मजा पोळ हिच्या चित्रकृतीच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन

Archana Banage

शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर भीषण अपघातात एक जागीच ठार

Archana Banage