Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ हजार शिष्यवृत्तीधारकांना दिलासा

विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास फौजदारी
समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांचे आदेश
अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास 420 महाविद्यालयांना सूचना

अहिल्या परकाळे / कोल्हापूर

लॉकडाऊनच्या काळात अनेककांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अकरावी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारकांकडून प्रवेश शुल्क आकारल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा सूचना समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी पत्रकाव्दारे दिल्या आहेत. त्यामुळे जिह्यातील जवळपास 220 व्यावसायिक व 200 विना व्यावसायिक महाविद्यालयांमधील 34 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्कही आकारले जात असल्याच्या तक्रारी समाजकल्याण खात्याकडे आल्यामुळे खात्याने कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी काही महाविद्यालयांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. यंदाही इचलकरंजी येथील एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिलेली नाही, अशी तक्रार विद्यार्थी संघटनेच्यावतीने सामाजिक न्याय मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश शुल्क आकारल्यास फौजदारी करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच संबंधीत महाविद्यालयावर कारवाई करून आठ दिवसाच्या आत पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हय़ातील महाडिबीटी या संकेतस्थळावर शासनमान्य अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू आहेत. अशा महाविद्यालयांनी सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्देशानुसार शासकीय व मान्यताप्रप्त विद्यापीठ संलग्न अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची असते. शिष्यवृत्तीमध्ये विलंब, गैरप्रकार अथवा काही अपहार झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेविरुद्ध दंडनीय कार्यवाही केली जाते. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई समाजकल्याण विभाग करते. या प्रकरणी सकृतदर्शनी प्राचार्य जबाबदार असल्यास समाजकल्याण अधिकारी संबंधीत प्राचार्यांवर गुन्हा दाखल करतात.

शिष्यवृत्तीधारकांना न्याय देणार
समाज कल्याण खात्याकडे गतवर्षी जेवढे अर्ज आले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाने शिष्यवृत्ती दिलेली आहे. समाजकल्याण खात्याने दिलेल्या विहीत वेळेत अर्ज भरून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. महाविद्यालयाकडून शिष्यवृत्ती न मिळाल्यास समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, शिष्यवृत्तीधारकांना न्याय दिला जाईल.
-बाळासाहेब कामत, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण

जिल्हय़ातील प्रवर्गनिहाय शिष्यवृत्तीधारकांची संख्या

. क्र.प्रवर्गयोजनाविद्यार्थी संख्या
1अनुसुचित जातीशिष्यवृत्ती12000
2अनुसुचित जातीफ्रिशिप1700
3इतर मागासवर्गीयशिष्यवृत्ती9000
4इतर मागासवर्गीयफ्रिशिप2000
5विमुक्त जाती व भटक्या जमातीशिष्यवृत्ती5500
6विमुक्त जाती व भटक्या जमातीफ्रिशिप1300
7विशेष मागास प्रवर्गशिष्यवृत्ती2000
8विशेष मागास प्रवर्गफ्रिशिप500
एकूण….….34000

Related Stories

सरुड परिसरात बिबट्याचा दुसऱ्यांदा कुत्र्यावर हल्ला

Archana Banage

Kolhapur : ‘लंम्पी आजारापासुन पशुधनाचे सरंक्षण करण्यासाठी गोकुळच्या लसीकरणाचा लाभ घ्यावा- गोकुळ चेअरमन विश्र्वास पाटील

Abhijeet Khandekar

कंदलगाव, नागांव मार्गावर धावणार केएमटी

Archana Banage

ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांचे निधन

Archana Banage

स्वच्छ सर्व्हेक्षणातर्गंत ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान

Archana Banage

शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा

Archana Banage