Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे ३६ बळी, १७२५ नवे रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात बुधवारी दुसऱया दिवशी तीस हजारांहून अधिक टेस्ट झाल्या, त्यातून 1 हजार 725 नवे रूग्ण आढळून आले. परिणामी सक्रीय रूग्णसंख्या 9 हजारांवर पोहोचली आहे. दिवसभरात कोरोनाने 36 जणांचा मृत्यू झाला. शहरात कोरोना मृत्यूमध्ये दोन दिवसांच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 36 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 521 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 409, नगरपालिका क्षेत्रात 676, शहरात 928 तर अन्य 516 आहेत. दिवसभरात 1 हजार 550 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 31 हजार 801 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 725 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 57, भुदरगड 51, चंदगड 16, गडहिंग्लज 66, गगनबावडा 4, हातकणंगले 221, कागल 55, करवीर 381, पन्हाळा 144, राधानगरी 63, शाहूवाडी 36, शिरोळ 101, नगरपालिका क्षेत्रात 98, कोल्हापुरात 406 तर अन्य 41 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 45 हजार 374 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 33 हजार 680 अहवाल आले. त्यापैकी 30 हजार 873 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 551 अहवाल आले. त्यातील 3 हजार 145 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 29 हजार 38 अहवाल आले. त्यातील 27 हजार 124 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 65 रिपोर्ट आले. त्यातील 604 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 33 हजार 680 स्वॅब रिपोर्ट आले.

शहरात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू, परजिल्हÎातील एकाचा मृत्यू
कोरोनाने बेळगाव जिल्हÎातील निपाणीच्या एकाचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये मंगळवार पेठ, सुभाषनगर, मेन रोड राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर शहर, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, रामानंदनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.

ऍटीजेन टेस्टमध्ये वाढ, रूग्णसंख्येतही वाढ
कोरोनाच्या तपासणीसाठी आरटीपीसीआर, ऍटीजेन आणि ट्रुनेट टेस्ट केल्या जातात. ऍटीजेन टेस्टचा रिपोर्ट अवघ्या 15 मिनिटांत निघतो. त्यामुळे प्रशासनाने अँटीजेन टेस्टची संख्या वाढवली आहे. मंगळवारी 19 हजार ऍटीजेन टेस्ट केल्या होत्या. बुधवारी ही संख्या 29 हजारांवर नेण्यात आली. परिणामी नव्या रूग्णांत पर्यायाने सक्रीय रूग्णांतही वाढ होत आहे.

टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 3551 350
ऍटीजेन टेस्ट 29038 914
ट्रुनेट टेस्ट 1065 461
एकूण टेस्ट 33680 1725
…….

 वर्गवारी        कोल्हापूर शहर    ग्रामीण, अन्य      एकूण

आजचे बाधीत रूग्ण 406 1319 1725
आजपर्यतचे बाधीत 40872 1,04,502 1,45,374
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1550 1,31,801
दिवसभरातील मृत्यू 9 27 36
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 928 3593 4521
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 350 3145 2551
अँटीजेन 914 27124 29038
ट्रुनेट 461 604 1065

Related Stories

आर के नगर येथील एकाच कुटुंबातील 24 सदस्यांनी घरीच उपचार घेऊन केली कोरोनावर मात

Archana Banage

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या गोयलच्या पोस्टरला कोल्हापुरी चपलांचा प्रसाद

Archana Banage

शिक्षकांना मिळाली ऑनलाईन ओळखपत्रे : तरुण भारत सोशल मीडिया वृत्ताची घेतली दखल

Archana Banage

सांगरुळच्या दत्त दूध संस्थेचे सामाजिक कार्य आदर्शवत – प्रा .जयंत आसगावकर

Archana Banage

चंदूरातील आत्महत्या हनीट्रॅपमधून ?

Archana Banage

कोल्हापूर : धारदार कात्रीने वार करून मुलाकडून बापाचा खून

Archana Banage