Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 17 रुग्ण, एकूण संख्या 278 वर

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढच होत आहे. आज दिवसभरात नवे 17 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 278 वर पोहचली आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सायंकाळी नव्या 3 रुग्णांची भर पडली आहे.

यात शाहुवाडीत 89कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर भुदरगडमध्ये 32 रुग्ण आहेत. आज दिवसभरात आलेल्या 17 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-2, भुदरगड-8, शाहूवाडी-7 असा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात रात्री 8 वाजेपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 278 वर गेला. जिल्ह्यात आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- 15, भुदरगड- 32, चंदगड- 18, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 5, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 15, राधानगरी- 42, शाहूवाडी- 89, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274 आणि पुणे -1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Related Stories

सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू: आशिष शेलार

Abhijeet Shinde

केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकर्‍यांना अदानी व अंबानीचे गुलाम बनविण्यासाठीच

Abhijeet Shinde

इतिहासात प्रथमच भाजपच कार्यालय राजभवनातून चालतंय ; नाना पटोलेंची खोचक टीका

Abhijeet Shinde

वेश्या व्यवसाय कायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Abhijeet Shinde

निर्बंधित क्षेत्र नियम 31 मार्चपर्यंत कायम

Patil_p

पुलवामात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!