Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात आठवा बळी


आजरा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा बळी

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्ह्यात आज दुपारी आजरा तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८ वर पोहचली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मेंढोली (ता. आजरा) येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारासाठी सीपीआर येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. त्यामुळे आजरा तालुक्यातील तो पहिला कोरोना बळी ठरला होता. उपचारादरम्यान आज दुपारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाने बळी घेतलेल्या रुग्णांची संख्या दोन वर पोहचली आहे.

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. ही एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्या नवीन कोरोना रुग्ण सापडलेला नसला तरी एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजरा तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आजरा आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

ब्लॉग; मैत्रीच्या अतुट धाग्याचे प्रतिक; भाऊसिंगजी रोड

Archana Banage

… असे अनेक खडसे प्रत्येक पक्षात; सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे : अंजली दमानिया

Tousif Mujawar

राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

Abhijeet Khandekar

पन्हाळा परिसरात बिबट्यांची डरकाळी; परिसरात भीतीचे वातावरण

Archana Banage

जम्बो हॉस्पिटलची जय्यत तयारी सुरू

Patil_p

भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू

Tousif Mujawar