Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात ऋण समाधान योजनेचा फज्जा

शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यापूर्वीच योजना बंद, स्टेट बँकेतील अधिकारी, कर्मचारी उदासीन

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारतीय स्टेट बँकने शेतकऱयांना मदत करावी या उद्दात हेतूने ऋण समाधान कर्जमुक्ती योजना कार्यान्वीत केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात योजना जाहीर केली आणि 31 जानेवारी पर्यंतच मुदत दिली. उद्या या योजनेचा कालावधी संपत असून आर्थिक वर्षातील गणनेच्या तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचीत राहणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱयांच्या बेफीकीरपणामुळे हजारो शेतकऱयांना फटका बसणार आहे.

एसबीआयच्या ऋण समाधान योजनेनुसार 31 जानेवारी 2021 च्या अगोदर कर्ज भरणाऱयासाठी 90 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. आता जुने कर्जदार 10 टक्के कर्ज भरून कर्जमुक्त होऊ शकतात. एसबीआयच्या अधिकाऱयांनी बँक डिफॉल्टर यांच्यासोबत बैठक घेऊन सांगितले होते की, आवास लोन सोडून इतर योजनांच्या अंतर्गत येणारे कृषी, व्यवसाय इत्यादींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 31 जानेवारी 2021 पर्यंत बँकेच्या ओटीएस योजनेचा लाभ घेऊन कर्ज भरू शकतात. या योजनेनुसार 10 टक्के रक्कम भरून बँकेचे असलेल्या कर्जपासून मुक्त होऊ शकतो.

बँकेच्या योजनेनुसार कर्जदारांने 31 मार्च 2016 पुर्वी कर्ज घेतलेले पाहीजे त्याचबरोबर ते कर्ज 31 मार्च 2019 रोजी एनपीएमध्ये गेले पाहीजे. तरच अशा शेतकऱयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ही योजना 31 मार्च 2016 नंतरही कर्ज घेतलेल्या पण एनपीएत गेलेल्या कर्जदारांसाठी आवश्यक होती. इतर व्यवसायापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेऐवजी स्टेट बँकेला पीककर्ज वा मध्यममुदतीचे कर्ज घेणाऱया शेतकऱयांनी संबंधीत बँकेला प्राधान्य दिले आहे. याचा विचार बँकेने करणे गरजेचा आहे. जिह्यातील सुमारे दोन हजारहून अधिक शेतकरी या तांत्रिक बाबीमुळे वंचीत राहणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा प्रसार, वा प्रचार म्हणावा तसा झाला नसल्यानेही अनेक कर्जदार वंचीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा बँकेने मुदत वाढवून देण्याबरोबरच कर्ज मार्च 2016 नंतरच्या कर्जाचाही विचार करणे गरजेचा आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष जुलै ते जून कारावे


राज्यात प्रामुख्याने ऊस पीक घेतले जाते. त्याची काढणीच मे पर्यंत चालते त्यामुळे शेतकऱयांच्या जमाखर्चाच वर्ष हे 1 जुलै ते 30 जून असे आहे. त्यामुळे स्टेट बँकेने ऋण समाधान योजनेसाठी 1 जुलै 2016 पुर्वी काढलेल्या आणि 30 जून 2019 पुर्वी एनपीए मध्ये जाणारे खाते ग्राहÎ धरले पाहीजे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ बँकेने आणू नये
शिवाजीराव माने,
संस्थापक जय शिवराय शेतकरी संघटना

Related Stories

निष्ठा रॅलीतून कोल्हापुरात बंडखोरांना उत्तर; उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसैनिकांचा पाठिंबा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : मंदिरात चोरी करून दागिने चोरणारी टोळी अटक

Archana Banage

फडणवीसांच्या त्यागाचा भाजपला अभिमान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एक मृत्यू, 46 नवे रूग्ण

Archana Banage

फक्त दहा रुपयात औषधोपचार

Archana Banage

आमदार गोपीचंद पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी हाकले औत

Archana Banage