Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 17 जणांचा मृत्यू, 797 नवे रुग्ण

Advertisements

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी वीस हजारांचा टप्पा ओलांडला

प्रतिनिधी/कोल्हापूर,

जिल्ह्यात आज, बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 17 जणांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोना मृत्यूची संख्या 605 वर पोचली आहे. तसेच 24 तासात 797 पॉझिटिव्ह आल्याने आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 20348 झाली आहे. दिवसभरात 697 जणांना कोरोना मुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले. त्यामुळे कोरोना मुक्ताची संख्या 11904 झाली आहे.

सीपीआरमध्ये शनिवार पेठेतील साठ वर्षीय पुरुष, हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील 70 वर्षीय महिला, पुलाची शिरोली येथील साठ वर्षे पुरुषांचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये लायकर गल्लीतील 67 वर्षे पुरूषाचा मृत्यू झाला. भुदरगड येथील केअर सेंटरमध्ये तालुक्यातील गारगोटी येथील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शहरातील कदमवाडी येथील हॉस्पिटलमध्ये निपाणी येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये शहरातील कसबा बावडा येथील 59 वर्षीय पुरुष, शाहू मिल कॉलनी येथील 87 वषींय पुरुष, कागल येथील 65 वर्षे पुरुष, आणि सुभाष रोडवरील 74 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राजारामपुरीतील हॉस्पिटलमध्ये न्यू पॅलेस रोडवरील 53 वर्षे पुरुष, भुदरगड तालुक्यातील मिणचे येथील 65 वर्षीय पुरुष, राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील 75 वर्षीय वृद्ध, मुक्त सैनिक वसाहत येथील 64 वर्षीय महिला आणि गडहिंग्लज तालुक्यातील येथील कमलेटी येथील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत 605 कोरोना मृत्यू झाले. यामध्ये ग्रामीण भागात 220, नगर पालिका क्षेत्रात 199, कोल्हापूर शहर 162 आणि अन्य 26 जणांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासांत आलेल्या 797 अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांत आजरा 3, भुदरगड 24, चंदगड 9, गडहिंग्लज 15, गगनबावडा 1. हातकणंगले 79, कागल 36, करवीर 82, पनहा़ळा 32 राधानगरी 48, शाहूवाडी 19, शिरोळ 35, नगरपालिका क्षेत्रात 100, कोल्हापूर शहरात 277 आणि अन्य 36 यांचा समावेश आहे, कोरोना रुग्णांची संख्या वीस हजार 348 झाली आहे.

गेल्या 24 तासांत 697 कौररोनामुक्त झाले. कोरोना मुक्ताची संख्या 11 हजार 904 झाली आहे. आलेल्या कोरौना रिपोर्टमध्ये शेंडा पार्क येथील लॅबमधून 1703 रिपोर्ट आले. यामध्ये 1285 निगेटिव्ह तर 402 पॉझिटिव होते टेस्टचे 505 रिपोर्ट आले त्यापैकी 445 निगेटिव आहेत साठ पॉझिटिव्ह आहेत. एकूण 797 पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली

24 तासात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कागलचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी आणि जिल्हा एड्स नियंत्रण केंद्राच्या समन्वयक दीपा शिपुरकर यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंतचे पॉझिटिव्ह रुग्ण -20348

कोरोना मुक्त 11904

सध्या उपचार घेत असलेले 7239

एकूण मृत्यू 605

Related Stories

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणप्रश्नी हातकणंगलेत सोमवारी रास्ता रोको

Abhijeet Shinde

हिंगणगाव येथे अवैध दारू व गांजा विक्री प्रकरणी महिला आक्रमक

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात २५० केंद्रांवर लसीकरण सुरू

Abhijeet Shinde

सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; कोल्हापुरातही गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

गांधीनगर चिंचवाड रस्त्यावरील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!