Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

Advertisements

51 नवे रूग्ण, 131 कोरोनामुक्त, 4 बळी,

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू खासगी रूग्णालयांतील आहेत. कोरोना बळींची संख्या 1600 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 151 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 759 झाली आहे. सध्या 2068 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 350 संशयितांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. जिल्हÎात सीपीआरमध्ये दिवसभरात एकाही कोरोना मृतांची नोंद झालेली नाही.

जिल्ह्यात सोमवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 350 जणांची तपासणी केली. सध्या 2 हजार 68 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 201 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 180 निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेन टेस्टचे 190 रिपोर्ट आले. त्यापैकी 11 पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी येथील 29 वर्षीय पुरूष, धोत्री गल्ली, गुरूवार पेठ येथील 66 वर्षीय महिला, राजोपाध्येनगर कोल्हापूर येथील 75 वर्षीय पुरूष आणि तुरंबे राधानगरी येथील 47 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत 1 हजार 600 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 776, नगरपालिका क्षेत्रात 336 महापालिका क्षेत्रात 355 तर अन्य 133 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 131 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 759 झाली आहे. आजरा 1, भुदरगड 2, चंदगड 1, गडहिंग्लज 2, गगनबावडा 4, हातकणंगले 4, कागल 2, करवीर 1, पन्हाळा 1, शाहूवाडी 6, राधानगरी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 7, कोल्हापूर शहर 15 आणि अन्य 5 असे 51 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.

पॉझिटिव्ह रूग्ण 51, कोरोनामुक्त 131, कोरोना 4 मृत्यू

       आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 47 हजार 427
       आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 43 हजार 759
       सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 2 हजार 68
        आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1600

Related Stories

बोलेरो पिकअप अंगावरुन गेल्यामुळे तीन वर्षाची बालिका जागीच ठार

Abhijeet Shinde

कोरोनामुळे एकाच कुंटूबातील तिघांचा मृत्यू : आईसह दोन मुले मृत्यूमुखी

Abhijeet Shinde

हुपरीचे भाजप उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल

Abhijeet Shinde

माजी विद्यार्थ्यांच्या बॅचची सामाजिक बांधिलकी

Abhijeet Shinde

कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर

Abhijeet Shinde

माजी आमदार अ‍ॅड. नानासाहेब माने यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!