Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू नोंद शुन्य; 22 नवे रूग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हÎात शुक्रवारी कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासांत 22 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 41 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली. दिवसभरात 715 जणांची तपासणी केली असून 125 जणांची अँटीजेन केली आहे. सध्या 288 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हÎात शुक्रवारी सायंकाळपर्यत आरटीपीसीआर चाचणीचे 424 रिपोर्ट आले. त्यापैकी 414 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन चाचणीचे 125 रिपोर्ट आले. त्यापैकी 122 निगेटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील 136 रिपोर्ट आले. त्यापैकी निगेटिव्ह 121 निगेटिव्ह आहेत. जिह्यात आजअखेर 49 हजार 132 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 47 हजार 157 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिह्यात 288 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासांत 22 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये गडहिंग्लज 1, हातकणंगले 2, कागल 1, करवीर 1, राधानगरी 1, शिरोळ 3, नगर पालिका क्षेत्र 4, कोल्हापूर महापालिका 6 व इतर 3 जणांचा समावेश आहे. आज अखेर तालुका, नगरपालिका, महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 863, भुदरगड 1227, चंदगड 1212, गडहिंग्लज 1466, गगनबावडा 147, हातकणंगले 5286, कागल 1664, करवीर 5628, पन्हाळा 1856, राधानगरी 1237, शाहूवाडी 1352, शिरोळ 2504, नगरपालिका क्षेत्र 7430, कोल्हापूर महापालिका 14 हजार 941 असे 46 हजार 813 आणि इतर 2 हजार 319 असे 49 हजार 132 रुग्ण संख्या आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

Related Stories

Kolhapur; जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

Kolhapur : ‘मशाल रॅली’द्वारे शिवसेनेचे सीमाबांधवांना पाठबळ

Kalyani Amanagi

वाडीरत्नागिरी येथे नवविवाहतेची आत्महत्या

Archana Banage

`सावित्रीबाई फुले’ मध्ये लवकरच हृदयरोग तपासणी विभाग

Archana Banage

कोल्हापूर : गनिमी काव्याने ठोकले ‘महावितरण’ला टाळे

Archana Banage

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Archana Banage