Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 3 बळी, 14 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेले दोघे कोल्हापूर शहरातील आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत 6 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 14 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 82 सक्रीय रूग्ण आहेत. जिल्हÎात कोणत्याही तालुक्यात नवा रूग्ण दिसून आलेला नाही. दिवसभरात 463 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये राजारामपुरी 14 व्या गल्लीतील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवार पेठेतील 61 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शास्त्राrनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये आजरा तालुक्यातील म्हसवेवाडी येथील 48 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. या 3 कोरोना बळींमुळे आजपर्यत केरोना बळींची संख्या 1 हजार 725 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 373 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 82 सक्रीय रूग्ण आहेत.

मंगळवारी दिवसभरात 463 जणांची तपासणी केली. त्यातील 114 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून मंगळवारी 673 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 665 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 75 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 73 रिपोर्ट आले, त्यापैकी 69 निगेटिव्ह आहेत. मंगळवारी गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 4 व अन्य 2 असे 6 रूग्ण आहेत. दिवसभरात 14 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 143 झाले. नव्या 6 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 950 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

Related Stories

Kolhapur : शिवसेनेचे राजाराम सुतार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Abhijeet Khandekar

Kolhapur : भोगावती महाविद्यालयाच्या आजी- माजी विद्यार्थ्यांची भोगावती ते रायगड पदयात्रा

Abhijeet Khandekar

Kolhapur; कोवाड येथील खुनाचा चोवीस तासात तपास

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात चोरट्यांचा धुमाकूळ; कळंबा परिसरात 4 बंगले फोडले

Abhijeet Khandekar

वूमन ऍट्रॉसिटी कायदा राबवा; प्रदेश महिला भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ

Archana Banage

गिरगाव-कोल्हापूर रोडवर ‘धूम’ चा थरार! जाणून घ्या काय घडले ?

Abhijeet Khandekar