Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 5 मृत्यू

दिवसभरात 299 नवे रूग्ण, 181 जण कोरोनामुक्त,एकूण कोरोना रूग्णसंख्या पोहोचली 55 हजारांवर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील 3 असून अन्य जिल्ह्यातील दोघे आहेत. गेल्या 24 तासांत 299 नवे रूग्ण दिसून आले. तर 181 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 521 झाली आहे.

मंगळवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या 5 जणात एक रत्नागिरी तर दुसरा पुणे जिल्ह्यातील आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील 58 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झालो गडहिंग्लज तालुक्यातील मांगलेवाडी येथील 65 वर्षीय महिलेचा गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी पुजारी मळा येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा (ता. संगमेश्वर) येथील 44 वर्षीय पुरूष आणि पुणे मोर्शी येथील 44 वर्षीय पुरूषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 828 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील 883, नगरपालिका क्षेत्रात 356, शहरात 413 तर अन्य 176 जण आहेत.

गेल्या 24 तासांत 181 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 653 झाली आहे. तसेच 299 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 9, भुदरगड 3, चंदगड 2, गडहिंग्लज 18, गगनबावडा 1, हातकणंगले 21, कागल 8, करवीर 37, पन्हाळा 11, राधानगरी 10, शाहूवाडी 3, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 42 कोल्हापुरात 116 तर अन्य 14 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 55 हजार 2 झाली आहे. दिवसभरात 973 जणांची तपासणी केली. त्यातील 264 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शहरात 505 तर ग्रामीण भागात 911 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी आलेल्या 1 हजार 479 अहवालापैकी 1 हजार 249 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 246 अहवाल आले. त्यातील 205 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 473 रिपोर्ट आले. त्यातील 362 निगेटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 521 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

कोरोना रूग्ण 299 ः एकूण ः 55002
कोरोनामुक्त 181 ः एकूण ः 50653
कोरोना मृत्यू 5 ः एकूण मृत्यू ः 1828
सक्रीय रूग्ण ः 2521

Related Stories

जिल्हा बँक : `’मातोश्री’ वरुन पाच जागांचा फतवा

Abhijeet Khandekar

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गगनबावड्याची वैदेही पाध्ये प्रथम

Archana Banage

गडहिंग्लजला ग्रामसेवकांच्या पत्नी व मुलाची गळफास घेवून आत्महत्या

Archana Banage

वळीवडे ग्रामपंचायतची ‘माझी वसुंधरा’साठी निवड

Archana Banage

गोकुळ निवडणूक : अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Archana Banage

यूथ बँक ‘ आठवड्यात सुरु होणार

Archana Banage