प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेत रविवारी 50 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 921 नवे रूग्ण आढळले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 239 झाली आहे. रविवारी 921 रूग्ण आढळून आले. पॉझिटिव्ह रूग्णांत झालेली घट दिलासादायक असली तरी वाढलेले बळी चिंताजनक आहेत.
जिल्ह्यातरविवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 50 जणांचा बळी घेतला. कोरोना बळींची संख्या 2 हजार 670 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 322, नगर पालिका क्षेत्रात 445, शहरात 578 तर अन्य 325 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 239 झाली आहे. दिवसभरात 1 हजार 76 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 64 हजार 88 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
गेल्या 24 तासांत 921 रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 50, भुदरगड 10, चंदगड 39, गडहिंग्लज 37, गगनबावडा 2, हातकणंगले 90, कागल 20, करवीर 119, पन्हाळा 55, राधानगरी 9, शाहूवाडी 24, शिरोळ 104, नगरपालिका क्षेत्रात 55 कोल्हापुरात 211 तर अन्य 96 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 77 हजार 997 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 1 हजार 905 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 466 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 2 हजार 186 अहवाल आले. त्यातील 1 हजार 873 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 574 रिपोर्ट आले. त्यातील 314 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यातकोरोनाने 50 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 7 जण परजिल्ह्यातील आहेत.
जिल्ह्यातील 43 जणांचा मृत्यू, शहरातील 14 जणांचा समावेश
दरम्यान, रविवारी कोरोनाने 50 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हÎातील 43 आहेत. शहरातील 14 जणांचा समावेश आहे. कोरोना मृत्यूत सोलापूर 58 वर्षीय पुरूष, जवाहरनगर कोल्हापूर 44 वर्षीय पुरूष, सीमलवाडी भुदरगड 38 वर्षीय पुरूष, आंबेवाडी पन्हाळा 65 वर्षीय पुरूष, अंबप हातकणंगले 57 वर्षीय पुरूष, भुये 65 वर्षीय पुरूष, वेसर्डे भुदरगड 34 वर्षीय महिला, शनिवार पेठ कोल्हापूर 34 वर्षीय महिला, सांगाव कागल 47 वर्षीय महिला, शहापूर पन्हाळा 60 वर्षीय महिला, महागाव 56 वर्षीय महिला, रूईकर कॉलनी 62 वर्षीय महिला, राजारामपुरी 65 वर्षीय महिला, कारंडे मळा 46 वर्षीय महिला, इचलकरंजी 45 वर्षीय पुरूष, नवे दानवाड शिरोळ 52 वर्षीय पुरूष, इचलकरंजी 58 वर्षीय महिला, कुंभोज 24 वर्षीय पुरूष, इचलकरंजी 48 वर्षीय पुरूष, इचलकरंजी 85 वर्षीय पुरूष, कोरोची 83 वर्षीय पुरूष, आजरा 55 वर्षीय पुरूष, मुगळी गडहिंग्लज 70 वर्षीय महिला, खोराटवाडी आजरा 80 वर्षीय पुरूष, करंबळी गारगोटी 65 वर्षीय पुरूष, आर. के. नगर कोल्हापूर 31 वर्षीय पुरूष, मोरे मानेनगर कोल्हापूर 53 वर्षीय पुरूष, कसंगले चंदगड 39 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर 56 वर्षीय महिला, कागवाड शिरोळ 75 वर्षीय पुरूष, मिरज 45 वर्षीय पुरूष, हणबरवाडी भुदरगड 45 वर्षीय पुरूष, रूकडी 51 वर्षीय पुरूष, कांटे संगमेश्वर 45 वर्षीय पुरूष, जरगनगर कोल्हापूर 80 वर्षीय महिला, ताकारी मिरज 40 वर्षीय पुरूष, राजेंद्रनगर कोल्हापूर 63 वर्षीय पुरूष, निगवे दुमाला 59 वर्षीय पुरूष, वडणगे 50 वर्षीय महिला, बेंगलोर 50 वर्षीय पुरूष, सिंधूनगर 81 वर्षीय पुरूष, हरिओमनगर रंकाळा 65 वर्षीय पुरूष, हुक्केरी बेळगाव 55 वर्षीय महिला, शिवाजी पार्क कोल्हापूर 29 वर्षीय महिला, इचलकरंजी 76 वर्षीय पुरूष, गुजरी कोल्हापूर 55 वर्षीय पुरूष, सरनाईक वसाहत कोल्हापूर 60 वर्षीय महिला, वारणा कोडोली पन्हाळा 85 वर्षीय पुरूष, बच्चे सावर्डे पन्हाळा 49 वर्षीय पुरूष आणि बागणी वाळवा येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

