Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 44 बळी, नव्या रूग्णांत घट

1096 पॉझिटिव्ह जिल्ह्यातील 43 परजिल्ह्यांतील एकाचा मृत्यू, मृतांत शहरातील 16, सक्रीय रूग्णसंख्येत घट
हातकणंगले, करवीर, कोल्हापूर शहरात शंभरांवर नवे रूग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी, कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 43 जण आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 96 नवे रूग्ण आढळले. तसेच 1 हजार 72 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 120 झाली. गुरूवारी कोरोनामुक्तांत वाढ झाली तर कोरोना मृत्यृ, नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णसंख्येतही घट झाल्याने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 232 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 634, नगरपालिका क्षेत्रात 527, शहरात 670 तर अन्य 401 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 120 आहे. दिवसभरात 1 हजार 72 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 75 हजार 914 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 96 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 14, भुदरगड 34, चंदगड 4, गडहिंग्लज 48, गगनबावडा 4, हातकणंगले 131, कागल 27, करवीर 262, पन्हाळा 60, राधानगरी 12, शाहूवाडी 9, शिरोळ 86, नगरपालिका क्षेत्रात 143 कोल्हापुरात 218 तर अन्य 44 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 93 हजार 266 झाली आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 2 हजार 303 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 998 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 1 हजार 509 अहवाल आले. त्यातील 1 हजार 150 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 171 रिपोर्ट आले. त्यातील 639 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्ह्यातील एकमेव सांगली जिल्ह्यातील बनेवाडी वाळवा येथील 44 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरोना मृतांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी, बाचणी, उचगाव, इचलकरंजी, चंदूर, किणी, साळोखेनगर, नाना पाटील नगर, उचगाव, शिवाजी पेठ, कसबा बावडा, सरूड, टेंबलाईवाडी, साने गुरूजी वसाहत, इचलकरंजीतील सांगली नाका, यशवंत कॉलनी, गणेशनगर, कोरोची, खमलेट्टी, आरळगुंडी, सोमवार पेठ, राणेवाडी, शिरोळ, चिपरी, जागृतीनगर, म्हारूळ, चिले नगर, शिवाजी उद्यमनगर, उदगाव, स्टेट बँक कॉलनी, वळीवडे, नंदगाव, लाईन बाजार, कदमवाडी, रंकाळा, शिंगणापूर, फुलेवाडी, माले, पेठवडगाव, इचलकरंजी, गडहिंग्लज, पट्टणकोडोली, भेंडवडे येथील व्यक्तींचा समावेश आहे.

कोरोना रूग्ण 1096 : एकूण : 93266
कोरोनामुक्त 1072 : एकूण : 75914
कोरोना मृत्यू 44 : एकूण मृत्यू : 3232
सक्रीय रूग्ण : 14120

Related Stories

शिंदे सरकार बरखास्त होऊ शकते, कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले हे कारण……

Rahul Gadkar

Kolhapur : इन्स्पायर अवॉर्डमध्ये कोल्हापुरची बाजी

Abhijeet Khandekar

एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण; एकच मागणी, शासनात विलिनीकरण

Archana Banage

केएमटी बसला ट्रकची धडक प्रवाशी जागीच ठार, सात जखमी

Archana Banage

KOLHAPUR(FULEWADI) रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, मध्यरात्री तीनच्या सुमारास झाली तोडफोड

Rahul Gadkar

कागलमध्ये संपन्न झाला ऋदयस्पर्शी भाऊबीज सोहळा…

Archana Banage